जळगाव- आ.गिरीश भाऊ महाजन यांच्या कट्टर समर्थकांना आटक.

0
633

आरोग्य दूत न्यूज
चंद्रशेखर सातदिवे
जळगाव जिल्हा (प्रतिनिधी)
दि १७/६/२०२१
जळगाव- आ.गिरीश महाजनांच्या कट्टर समर्थकांभोवती आवळला फास
जळगाव – बीएचआर गैरव्यवहार प्रकरणात आज अटक करण्यात आलेल्यांमध्ये माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांच्या दोन कट्टर समर्थकांना अटक करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
याबाबत वृत्त असे की, बीएचआर गैरव्यवहार प्रकरणात आता सात जणांना अटक करण्यात आली असून यात जळगाव व जामनेरसह इतर ठिकाणच्या मातब्बरांचा समावेश असल्याने खळबळ उडाली आहे. यातील अटक केलेल्यांमध्ये जामनेर येथील जितेंद्र रमेश पाटील, छगन झालटे आणि राजेश लोढा यांचा समावेश आहे.
यातील जितेंद्र रमेश पाटील व छगन झालटे हे माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांचे अतिशय कट्टर समर्थक मानले जातात. यातील जितेंद्र पाटील यांच्या घरून जामनेरातील राजकीय सूत्रे हलत असल्याचे आधीच दिसून आलेले आहे. महाजन यांचे अनेक महत्वाचे व्यवहार देखील ते सांभाळत असल्याची चर्चा आधी देखील होत होती. या अनुषंगाने आज त्यांना झालेली अटक ही लक्षणीय मानली जात आहे. तर छगन झालटे हे देखील आमदार महाजन यांचे अतिशय निकटवर्तीय म्हणून गणले जातात.
यात भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. राजूमामा भोळे यांना देखील धक्का बसलेला आहे. घोटाळ्यात अटक करण्यात आलेले भागवत भंगाळे हे भोळे यांचे मेहुणे आहेत. ते जळगावातील प्रतिथयश व्यावसायीक म्हणून गणले जातात. यामुळे त्यांना झालेली अटक ही खळबळजनक ठरली आहे. तर भुसावळातून अटक करण्यात आलेले आसीफ तेली हे देखील भाजप नेत्याचे पुत्र आहेत. यामुळे या प्रकरणातील राजकीय आयाम हा धक्कादायक ठरल्याचे मानले जात आहे.