जळगाव- जिल्हाधिकारीयांचे आदेशान्वये जिल्हास्तरीय लसीकरण टास्क फोर्स ची मिटींग मध्ये सखोल चर्चा करण्यात आली. सखोल चर्चेअंती मा.जिल्हाधिकारी यांनी खालीलप्रमाणे सूचना दिल्या

0
633

आरोग्य दूत न्यूज
चंद्रशेखर सातदिवे
जळगाव जिल्हा (प्रतिनिधी)
आज दिनांक १७/०६/२०२१
जळगाव- जिल्हाधिकारीयांचे आदेशान्वये जिल्हास्तरीय लसीकरण टास्क फोर्स ची मिटींग मध्ये सखोल चर्चा करण्यात आली. सखोल चर्चेअंती मा.जिल्हाधिकारी यांनी खालीलप्रमाणे सूचना दिल्या बोलविण्यात आली होती. त्या बैठकीस मा. जिल्हाधिकारी सोा श्री. अभिजीत राऊत, मा. श्री. गोसावी उपायुक्त म. न. पा. जळगाव जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी जि. प. जळगाव डॉ. प्रमोद पांढरे, वैद्यकीय अधिकारी महानगरपालीका जळगाव डॉ. राम रावलानी, आएमएचे सदस्य डॉ. राधेश्याम चौधरी, आयएपीचे सदस्य डॉ. वृषाली सरोदे, वैद्यकीय अधिकारी म. न. पा. जळगाव मनीषा उगले, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी जि प जळगाव डॉ दिलीप पोटोडे माता व बालसंगोपन अधीकारी डॉ. समाधान वाघ, सुविधा व्यवस्थापन जिल्हा रुग्णालय जळगाव श्री नितीन राठोड, व्हॅक्सिन आणि कोल्ड चेन मैनेजर जळगाव श्री जयकुमार कडवाल, हे सर्व जण उपस्थित होते. जिल्हा लसीकरण अधिकारी यांनी लसीकरणाबाबत मा. जिल्हाधिकारी यांना आढावा दिला. या सभेत कोविड १९ लसीकरणाच्या अनुषंगाने कोविड लसीची मागणी, कोविड लसीचे वितरण कोविड लस सत्राचे नियोजन व अंमलबजावणी, त्या अनुषंगाने येणा-या अडीअडचणी याबाबत सखोल चर्चा करण्यात आली. सखोल चर्चेअंती मा.जिल्हाधिकारी यांनी खालीलप्रमाणे सूचना दिल्या व त्याची तंतोतंत अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या.
१) १८ वर्षावरील लसीकरण लवकरच सुरु होणार आहे त्यापूर्वी ४५+ वर्षावरील चे लसीकरण जास्तीत जास्त
नागरिकांनी करून घेण्यात यावे असे आवाहन करण्यात आलेले आहे. २) कोवॅक्सिन चे उर्वरित दुसऱ्या डोस चे लाभार्थी लवकरात लवकर कव्हर करणे, कोक्सिन चा प्रथम डोस घेतलेल्या नागरिकांनी २८ दिवसानंतर दुसरा डोस न चुकता घेण्यात यावा असे आवाहन करण्यात आले व दुसऱ्या डोस न घेतलेल्या लाभार्थ्यांची यादी तालुका स्तरावर पाठविण्यात यावी. ३) वृद्धाश्रमातील सर्वांचे लसीकरण सेशन प्लॅन करण्यात यावे त्यासाठी सोबत रुग्णवाहिका, ऑक्सिजन
सिलिंडर, २ डॉक्टर आणि अत्यावश्यक साहित्य ठेवणे
४) ज्यांचे आधार कार्ड किंवा कोणतेही ओळख पत्र नाही अश्या बेघर फिरस्ती लोकांच्या लसीकरणासाठी आवश्यकतेनुसार आधार कार्ड काढून लसीकरण करणे ५) फ्रंट लाइन वर्कर, हेल्थ केअर वर्कर, ४५ वयाच्या शासकीय कर्मचारी यांना यापुढे १००% लसीकरण करणे
अनिवार्य राहील ६) कोविड-१९ वैद्यकीय प्रतिपूर्तीसाठी फ्रंट लाइन वर्कर, हेल्थ कैभर वर्कर यांना कोविड लसीकरण घेणे अनिवार्य आहे
७)परदेशी आणान्यांसाठी लसीकरण शाहू महाराज हॉस्पिटल महानगरपालिका जळगाव येथे सत्र सुरु करण्यात आलेले आहे. तरी जिल्ह्यातील परदेशात जाणाऱ्या सर्व लाभार्थ्यांना आवश्यक कागदपत्रांसह लसीकरणासाठी
शाहू हॉस्पिटल जळगाव येथे पाठविण्यात यावे. परदेशी जाणाऱ्यांचे ४ कागदपत्र चेक करण्यात येतील त्यात पासपोर्ट / व्हिसा, आधार कार्ड, ऍडमिशन लेटर किंवा आय २० फॉर्म हे चेक करण्यात यावे ८) पालकांनी लस घेतली तर भविष्यात मुलांचे कोविड पासून संरक्षण होऊ शकते याबद्दल जनजागृती करण्यात यावी
१) नगरपालिका व महानगरपालिका क्षेत्रातील व्यावसायिकांना व फेरीवाल्यांना लसीकरण करून घेणे बंधनकारक राहील. लसीकरण झालेले नसल्यास त्यांचेकडे ८ दिवस आधीचा निगेटिव्ह RTPCR रिपोर्ट सोबत बाळगणे बंधनकारक राहील
१०) Near-To-Home अंतर्गत प्रत्येक गावात आवश्यकतेनुसार व लस साठा उपलब्धतेनुसार लसीकरण मंत्र घेण्यात यावे
११) चाळीसगाव, चोपडा व बोदवड यांचे कोविड लसीकरणाचे काम अपेक्षेपेक्षा कमी आहे ते वाढविण्यासाठी आवश्यक ते नियोजन करण्यात यावे
१२) पहिल्या व दुसऱ्या कोविड १९ लाटेत कोविड रुग्ण न आढळलेली गावातील नागरिकांनी प्राधान्याने कोविड चे लसीकरण करून घेण्यात यावे असे आवाहन करण्यात आले व आरोग्य विभागाने तसे नियोजन
करुन अशा गावांचे/पाड्यांचे लसीकरण प्राधान्याने करून घ्यावे असे ठरले जिल्हा लसीकरण अधिकारी यांनी सर्वांचे आभार मानून मा. जिल्हाधिकारी यांचे मान्यतेने सभा संपन्न झाल्याचे जाहीर केले.
जिल्हा आरोग्य अधिकारी/ जिल्हा परिषद जळगाव