डॉ.प्रा.सौ.सुनिता राजेश मांडोळे यांनी पी.एच.डी(डॉक्टरेट) संपादन केल्याबद्दल त्यांचे पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

0
363

आरोग्य दूत न्यूज
एन एस भुरे (संपादक)
दि,२१/६/२०२१
डॉ.प्रा.सौ.सुनिता राजेश मांडोळे यांनी पी.एच.डी(डॉक्टरेट) संपादन केल्याबद्दल त्यांचे पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे  डॉ .प्रा .सौ.सुनिता राजेश मांडोळे यांनी “मराठी” या विषयात “सन 2000 ते 2010 या काळातील निवडक ग्रामीण कथांचा अभ्यास ” या विषयावर  पी.एच.डी.संपादन केली.
डॉ.प्रा.सौ.सुनिता मांडोळे -गुंजाळ यांनी पीएचडी प्राप्त केल्याने ,पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष, माजी आमदार भाऊसाहेब श्री .दिलीप वाघ ,राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष श्री .विकास पाटील सर पाचोरा नगरपालिकेच्या नगरसेविका सौ .सुचेताताई वाघ ,तनिष्का गट नेत्या सौ .ज्योती ताई वाघ, यांनी शाल , श्रीफळ व साडी देऊन सन्मानित केले.यावेळी राष्ट्रवादी तालुका अध्यक्षा रेखाताई देवरे ,सौ .जयश्री मिस्त्री सौ .सुरेखा पाटील , सौ .दिपमाला पाटील ,सौ .सुवर्णा शिंदे, सौ .सुनीता वारूळे,या उपस्थित होत्या .
डॉ. प्रा.सौ.सुनिता राजेश मांडोळे यांनी पी.एच.डी(डॉक्टरेट) संपादन केल्याबद्दल त्यांचे मनस्वी अभिनंदन केले व भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या