कोवीड मध्ये कार्यरत असणा-या कंत्राटी कर्मचा-यांना कायमस्वरुपी करण्यात यावे.(महाराष्ट्र नवनिर्माण सेना अनिल वाघ (जिल्हा उपाध्यक्ष)

0
521

आरोग्य दूत न्यूज
एन एस भुरे (संपादक)
दि,२१/६/२०२१
भडगाव- कोवीड मध्ये कार्यरत असणा-या कंत्राटी कर्मचा-यांना कायमस्वरुपी करण्यात यावे.(महाराष्ट्र नवनिर्माण सेना अनिल वाघ (जिल्हा उपाध्यक्ष)
२०२० पासुन ते आजपावेतो आम्ही कोवडी या संसर्गाचा सामना करीत आहोत. सामना करीत असतांना अनेक परीवारांनी त्यांच्या कुटूंबातील सदस्यांना या माहामारीने हिरावुन नेले. अनेक कुटूंब उध्दवस्त झाली. या महामरीमुळे माणुस मानसापासुन दुरावला गेला. परक्यापणाची वागणुक याच काळात अनुभवास मिळत आहे. इतक्या प्रचंड दहशतीमध्ये समाज जगत असतांना, ऐकीकडे मात्र समाजातील काही घटक उदा.- पोलीस बांधव होमगार्ड, महसुल विभागातील कर्मचारी बांधव, नगरपालिकेमधील बांधव, समाजसेवक, सामाजिक संस्था, आरोग्य विभागातील कर्मचारी आणि विशेष म्हणजे ज्यांची कोवीडच्या काळात नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. असे सर्व कंत्राटी कर्मचारी हे मात्र आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडीत होते व आहेत. लोकांनी देव कधी पाहीला नाही, पण त्यांना देव या कर्मचा-यांमध्ये अनुभावयाला मिळाला.
आरोग्य विभागातील कंत्राटी पध्दतीने काम करणा-या मग डॉक्टर्स, आरोग्य सेविका (परीचारीका), वार्डबॉय यांची व्यथा मन सुन्न करणारी आहे. कोवीडच्या संसर्गाचा प्रभाव ज्यावेळी मोठया प्रमाणात सुरु झाला त्यावेळी आपले आपल्यापासुन अंतर राखुन वागत होते. मदतीस कोणी कोणासाठी तयार होत नसत. अतिशय भयावहक परिस्थिती या दरम्यान निर्माण होती. खाजगी रुग्णालयात मोठ्या प्रमाणात लुट या दरम्यान पाहवयास मिळाली. शासकीय कोवीड सेंटर मध्ये कर्मचा-यांच्या कमतरतेमुळे अनेक रुग्णांना उपचारा अभावी आपले प्राण गमवावे लागले. कर्मचारी अपुर्ण असल्याने रुग्णांना सेवा देण्यास आरोग्य विभाग कमी पडु लागले. रुग्णांची हेडसांड होऊ लागली. समाज मनात यावेळी मोठया प्रमाणात सरकार व आरोग्य विभागाबद्दल रोष दिसुन येत होता. अशावेळी शासनाच्या रुग्णांच्य, व समाजाच्या मदतीसाठी तुटपुंज्या मानधनावर कंत्राटी कर्मचारी धावुन आले. त्यांनी रुग्णांची अतिशय जिवेभावे, प्रामाणिकपणे सेवा केली असुन अजुनही करीत आहेत. आपल्या कुटूंबापासुन दुर लहान लहान मुलांपासुन दुर राहत या आरोग्यसेविका (परीचारीका) यांनी आपल्या कर्तव्यात कुठेही कसुर पडु दिला नाही. आपली रुग्णांना गरज आहे याची पुर्ण जाणीव ठेऊन कधी आपल्या कुटूंबाच्या सदस्याप्रमाणे रुग्णाला त्या कधी आईच्या बहीणीच्या रुपात दिसुन आल्या कुटूंबाने दुर केल्यानंतर जर रुग्णाला कोणी आधार दिला असेल तर त्या आमच्या आरोग्य सेविका (परीचारीका) ज्यांच्यात रुग्णाला आई दिसली. त्यांनी स्वतः व कुटूंबापेक्षा आपल्या रुग्ण सेवेला जास्त महत्त्व दिले.
अशीच परीस्थिती डॉक्टर्स यांचीही दिसुन आली. त्यांनी आपल्या कर्तव्यात कुठेही कसुर न पडु देता रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा मानुन आपले कर्तव्य आजही प्रामाणिकपणे पार पाडीत आहेत. कुठलीही सुविधा नसतांना संसर्गाचा धोका मोठ्या प्रमाणात दिसुनही निव्वळ रुग्णांची सेवा हे ध्येय डोळयासमोर ठेऊन रुग्णांची अहोरात्र सेवा करणारे भाऊ म्हणुन कधी मुलगा म्हणुन निभावली अशा रुग्ण सेवकांचे आज शासनासह समाजावर फार मोठे उपकार आहेत.
जे शब्दात मांडता येणार नाही. परंतु जे कर्मचारी शासनाला व समाजाला गरज असतांना कुठलीही पर्वा न करता धावुन आले अशा कर्मचा-यांना शासनाकडुन मात्र अतिशय चुकीची वागणुक मिळतांना दिसुन येत आहे. निव्वळ स्वतःची गरज असतांना त्यांच्या नियुक्या करायच्या आणि पुन्हा गरज संपली की त्यांना कामावरुन कमी करायचे हे शासनाचे धोरण अतिशय वेदना देणारे असुन अशा प्रामाणिक कर्मचा-यांवर अन्याय करणारे आहे.
करार संपल्यानंतर या कर्मचा-यांच्या भवितव्याचा विचार कुठेही शासन करतांना दिसुन येत नाही. काम गेल्यानंतर त्यांनी काय करावे हा सर्वात मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा दिसुन येतो. अनेकांची कुटुंब ही त्यांच्यावर अवलंबुन आहेत, ज्यांना आम्ही कोवीड योद्धा म्हणतो. अशा योद्ध्यांसमोर जगण्याचा यक्ष प्रश्न निर्माण होणार आहे. अशा चुकीच्या धोरणामुळे ज्यांनी समाजाच्या व शासनाच्या अडचणीत मदतीचा हात दिला व अशा वाईट प्रसंगातुन शासनास समर्पीत केले. अशा कर्मचा-यांच्या मागे त्यांच्या कठीण प्रसंगी समाजाने व शासनाने खंबीरपणे उभे राहण्याची आज गरज असुन शासनाने त्यांना त्यांच्या वाईट काळातील कार्याबद्दल कायम स्वरुपी सेवेत समावुन घ्यावे. त्यांना पुर्णवेळ कामावर घेऊन त्यांच्या कार्याचा गौरव करावा.
सिमेच्या संरक्षणासाठी जशी गरज सैनिकांची देशाला आहे, त्याचप्रमाणे जीवे भावे सेवा करणा-या अशा कर्मचा-यांची समाजाला गरज आहे. देशाच्या संरक्षणासाठी आम्ही सैनिकांची काळजी घेतच असतो. मग अशा वाईट प्रसंगापासुन समाजाला सुरक्षीत करण्यासाठी अशा कर्मचा-यांचीही तितकीच गरज आहे. कारण समाजाने या कर्मचा-यांमध्ये रुग्णांसाठी एक सैनिकच अनुभवला आहे.
आरोग्य विभागामध्ये अनेक जागा या रिक्त आहेत. अशा वाईट प्रसंगासाठी शासनास नेहमी तत्पर राहण्याची गरज आहे. आरोग्य सेवेतील तृटयांमुळे किती मोठया प्रमाणात समस्या निर्माण झाल्या याचा अनुभव या काळात आलेला दिसुन येतो. आरोग्य विभागातील कमतरता व कमी असलेला कर्मचारी वर्ग यामुळे ऐनवेळी झालेली धावपळ पहावयास मिळाली. या तृटयांची किंमत मात्र अनेकांना आपल्या कुटूंबातील सदस्यांना गमावुन चुकवावी लागली. म्हणुन भविष्यात शासनाने त्यांना त्यांच्या वाईट काळातील कार्याबद्दल कायम स्वरुपी सेवेत समावुन घ्यावे. त्यांना पुर्णवेळ कामावर घेऊन त्यांच्या कार्याचा गौरव करावा.
मा. जिल्हा शल्य चिकीत्सक साो., सामान्य रुग्णालय, जळगांव यांना निवेदन देण्यात आले.

व स्वीय सहाय्यक निवासी उपजिल्हाधिकारी जळगाव यांना देण्यात आले.