पाचोरा-भडगाव कोरोनामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. त्यामुळे लोकांच्या समस्या गावातच सुटाव्यात या उद्देशाने आमदार आपल्या दारी

0
434

आरोग्य दूत न्यूज
एन एस भुरे (संपादक)
दि,२३/६/२०२१
पाचोरा-भडगाव कोरोनामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. त्यामुळे लोकांच्या समस्या गावातच सुटाव्यात या उद्देशाने आमदार आपल्या दारी
भडगाव ता.23: आमदार कीशोर पाटील यांनी कोरोनासह ग्रामस्थांच्या समस्या गावपातळीवरच सोडविण्यासाठी ‘आमदार आपल्या दारी’ हा उपक्रम हाती घेतला आहे. 25 जुन पासून तालुक्यातील प्रत्येक गावाला ते भेट घेऊन आढावा घेणार आहे. त्याच्यांसोबत तालुकास्तरावरील सर्व प्रशासकीय यंत्रणा सोबत राहणार आहे.
————
आमदार कीशोर पाटील यांनी ग्रामिण भागात ‘आमदार आपल्या दारी’ या
उपक्रमांतर्गत तालुक्यातील प्रत्येक गावाचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यादृष्टीने 25 जुन पासून त्यांचा तालुक्यात नियोजित दौरा आहे. दौर्यात ते गावातील कोरोना, घरकुल योजना, कृषी, पिक कर्ज, विकास कामे, शिक्षण, वीज, रेशन वाटप आदि बाबींचा आढावा घेणार आहेत. दौर्यात तालुका स्तरावरील सर्व अधिकारी, स्थानिक यंत्रणा, सभापती, पंचायत समीती सदस्य उपस्थीत राहणार आहे..तर गावात ग्रामपंचायत, विकास सोसायटीचे पदाधिकारी उपस्थित असतील. उपस्थीत ग्रामस्थांच्या समस्या आमदार कीशोर पाटील ऐकुन घेऊन त्याबाबत प्रशासकीय यंत्रणेला सुचना देणार आहेत. तर पुढच्या 2-3 महीन्यात पुन्हा दौरा काढुन मागील दौर्याचा आढावा घेणार आहेत. जिल्ह्यात पहील्यांच अशा प्रकारे आमदार उपक्रम राबवित आहे. त्याच्यां या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
असा असणार दौरा
25 जुन ला वाडे, बाबंरूड प्र.ब., नावरे, गोंडगाव, सावदे, घुसर्डी ला दौरा असणार आहे. तर 26 जुन ला लोणपिराचे, बोरनार, कनाशी, बोदर्डे, निंभोरा, 27 जुन ला भोरटेक- उमरखेड , तांदुळवाडी, मळगाव ला 28 जुन ला पिप्रिंहाट, शिंदि, पेंडगाव, खेडगाव, बात्सर येथे दौरा असणार आहे. 2 जुलै ला आडळसे, जुवार्डी, गुढे, पथराड, कोळगाव तर 3 जुलै रोजी पिचर्डे, शिवणी, पाढरंद, वडजी, वाक येथे 4 जुलै ला वडगाव बु., बाळद,कोठली, पासर्डी 5 जुलै  ला वडगाव नालबंदी, पळासखेडे, महीदंळे, वलवाडी येथे दौरा नियोजीत आहे. सदरचा दौरा हा सकाळी आठ ते दुपारी 12 वाजेपर्यंत असेल आमदार कीशोर पाटील यांचे स्विय सहाय्यक राजेश पाटील यांनी सांगीतले.
कोरोनामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. त्यामुळे लोकांच्या समस्या गावातच सुटाव्यात या उद्देशाने  आमदार आपल्या दारी हा उपक्रम हाती घेतला आहे. लोकाच्या समस्या गावातच सोडण्याचा माझा प्रयत्न असणार आहे.
-कीशोर पाटील आमदार पाचोरा-भडगाव