वडजी- टी.आर.पाटील विद्यालय,इंग्लिश स्कूल व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात स्वर्गीय मातोश्री कमलताई हरी पाटील पुण्यस्मरणार्थ निबंध स्पर्धा व गरजु विद्यार्थ्यांना क्षैक्षणिक साहित्य वाटप

0
164

आरोग्य दूत न्यूज
एन एस भुरे (संपादक)
दि,२४/६/२०२१
वडजी- टी.आर.पाटील विद्यालय,इंग्लिश स्कूल व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात स्वर्गीय मातोश्री कमलताई हरी पाटील पुण्यस्मरणार्थ निबंध स्पर्धा व गरजु विद्यार्थ्यांना क्षैक्षणिक साहित्य वाटप कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्थेचे टी.आर.पाटील विद्यालय,इंग्लिश मेडिअम स्कूल व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात आज दि.२४/०६/२०२१ गुरुवारी संस्थेच्या मार्गदर्शिका तथा जेष्ठ संचालिका स्वर्गीय मातोश्री कमलताई हरी पाटील यांचे चतुर्थ पुण्यस्मरण दिनानिमित्त *महिला दक्षता अध्यक्षा नगरसेविका योजना पाटील* यांचे हस्ते  प्रतिमा पूजन,माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.तसेच वाक व रोकडा बाबुनगर येथे गरीब गरजु विद्यार्थ्याना क्षैक्षणिक साहित्य वाटप* केले. वात्सल्यसिंधु मातोश्री ताईआजी या विषयावर निबंध लेखन स्पर्धा संपन्न झाली. मुख्याध्यापक डी.डी.पाटील.मा.प्र.मुख्याध्यापक बी.वाय.पाटील,वरिष्ठ शिक्षक एस.जे.पाटील,जेष्ठ शिक्षक ई.एम.पाटील सह सर्व शिक्षक,शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते. नियोजन समिती सदस्य जे.एच.पवार,वाय.डी.भोसले,एम.एस.देसले,कला शिक्षक वाय.ए.पाटील यांनी आयोजन केले.सदर उपक्रमाचे संस्थेचे चेअरमन प्रतापराव हरी पाटील सह सर्व संचालक मंडळ,गटशिक्षणाधिकारी सचिन परदेशी,विस्ताराधिकारी गणेश पाटील,केंद्रप्रमुख संजय न्याहिदे,रविंद्र सोनवणे यांनी कौतुक केले.