आरोग्यदुत न्युज
एन एस भुरे (संपादक)
दि,26/6/2021
मातंग समाजाला पाचोऱ्यात सामाजिक सभागृह द्या !
मानवहित लोकशाही पक्षाची आ.किशोर अप्पा पाटील यांचे कडे मागणी
पाचोरा शहर व परिसरात मोठ्या प्रमाणावर मातंग समाज बांधव राहत आहेत,त्यांचे विविध प्रकारचे धार्मिक कार्य ,लग्न सोहळे, समाजाचे मेळावे आदी कामांसाठी समाजाकडे हक्काची जागा नाही त्यामुळे पाचोरा नगरपालिका हद्दीत मातंग समाजासाठी जागा उपलब्ध करून द्यावी व त्या जागेवर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे किंवा लहुजी सावळे यांचे नावे सामाजिक सभागृहाचे बांधकाम करून मिळावे अशी आग्रही मागणी मानवहित लोकशाही पक्षाच्या वतीने आ.किशोर अप्पा पाटील यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.निवेदनावर जिल्हाध्यक्ष सुनील पाचुंदे ,तालुकाध्यक्ष योगेश गायकवाड यांच्या सह्या आहेत.