पाचोरा- वेब मिडीया असोसिएशन मुंबई च्या – जळगाव जिल्हा वेब असोसिएशन व पाचोरा वेब मिडिया असोसिएशनच्या कार्यकारणी पदाधिकारी यांचे सिध्दीविनायक मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटल पाचोरा संचालक डाॅ.स्वप्निलदादा पाटील यांचे शुभहस्ते सत्कार सोहळा संपन्न.

0
228

आरोग्यदुत न्युज
एन एस भुरे (संपादक)
दि,२/७/२०२१
पाचोरा- वेब मिडीया असोसिएशन मुंबई च्या – जळगाव जिल्हा वेब असोसिएशन व पाचोरा वेब मिडिया असोसिएशनच्या कार्यकारणी पदाधिकारी यांचे सिध्दीविनायक मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटल पाचोरा संचालक डाॅ.स्वप्निलदादा पाटील यांचे शुभहस्ते सत्कार सोहळा संपन्न.
शाॅल-श्रीफळ-पुष्पगुच्छ-चहा-पान- नाश्ता सोबत दिली सर्वांना अनमोल अशी भेटवस्तु- दिला सर्व पत्रकार बंधुंना खास मान-सन्मान
पाचोरा प्रतिनिधी :वेब मिडीया असोसिएशन मुंबई चे अध्यक्ष श्री.अनिलभाऊ महाजन यांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली विभागीय अध्यक्ष अजयकुमार जैस्वाल  जिल्हा अध्यक्ष ईश्वरभाऊ चोरडिया यांच्या नेतृत्वाखाली जळगाव जिल्हा व पाचोरा तालुका वेब मिडिया असोसिएशन घोषीत झाली आहे.
वेब मिडिया असोसिएशन चे वेब पोर्टल चे असलेले पाचोरा पदाधिकारी पत्रकार व संपादक हे दिवस-रात्र हे सर्वांना मोठे करण्यासाठी आपली सेवा देत असतात आणि ते सर्व मंडळीची वेब मिडीया जिल्हा व तालुका असोसिएशन पदी निवड झाली हि आम्हा सर्वांना अभिमानास्पद बाब आहे.डाॅ.स्वप्नीलदादा यांनी मोठ्या मनाने आज सर्व वेब मिडीया असोसिएशन चे पदाधिकारी यांचे स्वागत व सत्कार केले.
यावेळी यांनी सर्वांना पेढे भरवुन व पुष्पगुच्छ आणि शाॅल देऊन तसेच नाश्ता व चहा-पाणासोबत अनमोल अशी भेटवस्तु देऊन सन्मानीत  केले.
यावेळी वेब मिडीया असोसिएशन पदाधिकारी जिल्हा उपाध्यक्ष सचिनभाऊ पाटील व जिल्हा सरचिटणीस गणेश शिंदे व जिल्हा सचिव नंदुभाऊ शेलकर व जिल्हा संघटक नरसिंह भुरे व जळगाव जिल्हा समन्वयक जावेद शेख जळगाव जिल्हा खजिनदार पदी -फोकस न्युज कार्यकारी संपादक भुवनेश दुसाने तालुका अध्यक्ष -एम एन न्युजचे निलेश पाटील उप तालुका अध्यक्ष -तालुका माझा संपादक बंडुभाऊ सोनार उप तालुका अध्यक्ष -सी एन आय महाराष्ट्र दिपक गढरी तालुका सचिव -झेप इंडियाचे संजय पाटील तालुका सरचिटणीस- झुम मराठी संपादक दिलीप परदेशी तालुका समन्वयक- जनलक्ष संपादक प्रमोद बारी ट्रेन लाइव्ह प्रवाशी संपादक दिलीप पाटील हे वेब असोसिएशन पदाधिकारी यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला.
सर्व निवड झालेले वेब मिडिया असोसिएशन चे पदाधिकारी यांचे अभिनंदन करण्यात आले.यावेळी पाचोरा सर्व वेब मिडिया असोसिएशन पदाधिकारी यांनी डाॅ.स्वप्निलदादा पाटील यांचे आभार मानले असुन त्यांना डाॅक्टर डे च्या शुभेच्छा दिल्या आहेत.