पाचोरा न.पा प्रशासन व ठेकेदार यांना दहा दिवसाचा अल्टिमेट देत हिवरा नदीवरील पूल बांधाच तात्काळ नागरिकांसाठी पर्यायी कच्चा रस्ता करावा नाहीतर तीव्र आंदोलन,, (अनिल महाजन)

0
374

आरोग्यदूत न्युज
एन एस भुरे (संपादक)
दि:03/07/2021
पाचोरा न.पा प्रशासन व ठेकेदार यांना दहा दिवसाचा अल्टिमेट देत हिवरा नदीवरील पूल बांधाच तात्काळ नागरिकांसाठी पर्यायी कच्चा रस्ता करावा नाहीतर तीव्र आंदोलन,, (अनिल महाजन)
हिवरा नदीवरील पूल बांधाच, पण अगोदर पर्यायी व्यवस्था हवीच नाहीतर तीव्र आंदोलन,,,- अनिल महाजन
पाचोरा हिवरा नदी पूल प्रकरण – अनिल महाजन यांचे पाचोरा न.पा प्रशासन व ठेकेदार यांना दहा दिवसाचा अल्टिमेट देत तात्काळ नागरिकांसाठी पर्यायी कच्चा रस्ता करावा तरच पुलाचे पुढील काम सुरू करावे अन्यथा ए.एम फाऊंडेशन कडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास स्थानिक न.पा प्रशासन व ठेकेदार जबाबदार राहतील अशा मागणीपर निवेदन देण्यात आले,
पाचोरा कुष्णापुरी हिवरा नदी पुलाचे उंची वाढवण्याचे काम सुरू आहे. त्याबाबत कुष्णापुरी, सिंधी कॉलनी, भैरव नगर त्रंबक नगर, गुरुदत्त नगर भागातील, रहिवाशांची दैनंदिन जडण-घडण साठी शहरात जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. न.पा प्रशासन आणि ठेकेदार यांनी कुठलीही पर्यायी व्यवस्था कच्चा रस्ता किंवा लोखंडी पूल पायी जाणाऱ्या नागरिकांसाठी न बनवता हिवरा नदी वरील पुल तोडुन पुलाचे काम सुरू केले व शहरात जाण्याचा रस्ता पुर्णपणे बंद केलेला आहे. स्थानिक न.पा प्रशासनाचे काय धोरण आहे हे प्रशासनालाच माहीत, पावसाळयात पुल बांधणे पण हे जनहिताचे धोरण नाही एवढंच, असे अनिल महाजन यांनी म्हंटले, याबाबत पाचोरा  प्रांत अधिकारी राजेंद्र कचरे साहेब व नगरपालिका मुख्य अधिकारी शोभा बाविस्कर यांना निवेदन दिले आहे. दहा दिवसात पर्यायी कच्चा रस्ता नागरिकांच्या सोयीसाठी तयार करून न दिल्यास त्यानंतर संबंधित ठिकाणी ए.एम फाऊंडेशन च्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. तेथे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास न.पा प्रशासन व ठेकेदार जबाबदार राहतील याची नोंद घ्यावी, असा अल्टिमेटम अनिल भाऊ महाजन यांनी दिला आहे सदर निवेदन उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरेसाहेब व शोभा बाविस्कर मॅडम यांना ईमेल’ने पाठवण्यात आले आहे.