जामनेरच्या भोंदु महाराजने लग्न जमवून देतो चे आमिष दाखवून दुसखेडाच्या नवरदेवाची केली फसवणूक,

0
1354

 

आरोग्यदुत न्युज
एन एस भुरे (संपादक)
दि,४/७/२०२१
जामनेरच्या भोंदु महाराजने लग्न जमवून देतो चे आमिष दाखवून दुसखेडा च्या नवरदेवाची केली फसवणूक
पाचोरा- तालुक्यातील दुसखेडा येथील नवरदेवाची लग्नाच्या बोहल्यावर चढण्याआधीच  नवरी मुलगी आलीच नाही म्हणून फसवणूक झाल्याचा प्रकार घडला आहे.
या बाबत सविस्तर माहिती अशी की. जामनेर तालुक्यातील पळासखेडे गुजराचे या गावातील आरोपी राजेश्वर नारायण पाटील हा लग्न जमविण्याचे काम करतो पाचोरा तालुक्यातील दुसखेडा येथील रवींद्र प्रकाश पाटील याला व्हाटस्प वरुन एका मुलीचा फोटो टाकला आणि तुला ही मुलगी पंसद असेल तर तुझा विवाह या मुलीशी लावुन देतो असे सांगून नवरदेव मुला कडुन तब्बल एक लाख पन्नास हजार रुपये रोख मुलीचे दागिने आणि अजुन एका मध्यस्थी ला देण्यासाठी घेतले असता. नवरी घेऊन येतो असे आरोपीने विश्वासाने सांगितले म्हणून दुसखेडा येथे दि. २२ जुन २०२१ रोजी चि. रविंद्र चा विवाह सोहळा चे आयोजन करण्यात आले ठरल्या प्रमाणे हळद लावली गेली त्यानंतर दुसऱ्या दिवशी लग्न जमविणार्या बहाद्दर ने मोबाइल स्विच अॉफ करुन टाकला. विवाह साठी आलेल्या वर्‍हाडी नवरीची वाट बघुन थकुन गेले तेव्हा हे सर्व खोटे असल्याचे उघड झाले. आरोपी राजेश्वर हा फसवणूक करुन फेसबुक चे  मुलींचे फोटो डाऊनलोड करून अशाच प्रकारे फसवणूक करीत आहे त्याच्या विरोधात पाचोरा पोलीसात  भादवी ४२० प्रमाणे गुन्हा दाखल आज दि. ४ जुलै रोजी दुपारी करण्यात आला आहे. आरोपी पोलीसांच्था ताब्यात होता. पुढील तपास पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे.