कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली आज पाचोरा प्रांताधिकारी यांना निवेदन.

0
255

आरोग्यदुत न्युज
एन एस भुरे(संपादक)
दि,५/७/२०२१
कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली आज पाचोरा प्रांताधिकारी यांना निवेदन
पाचोरा – भडगाव तालुक्यातील भोगवटा वर्ग २ च्या मिळकती वर्ग  १ मध्ये करण्याचा शासनाचा महाविकास आघाडीचा निर्णयाची अमलबजावणी वर्षेभर करण्यात येणार असल्याची ग्वाही प्रांताधिकारी यांनी कॉंग्रेस शिष्टमंडळाला दिली.
शासनाच्या धोरणात्मक निर्णय घेतला की भोगवटा वर्ग २ चा वर्ग १ मध्ये करणे आणि सत्ता ब चा प्रकार च्या मिळकती बाबतचा तिन दिवसाचा कॅम्प पाचोरा उपविभागीय कार्यालयात लावण्यात आला होता मात्र यामुळे मिळकती धारकांची कागदपत्रांची जमवाजमव करण्यात दमछाक होत होती त्यामुळे याची मुदत वाढवून देण्याची मागणी कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली आज पाचोरा प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आल्यावर प्रांताधिकारी यांनी सदरची प्रक्रिया ही वर्षभर चालु राहील असे आश्वासन दिले. यावेळी कॉंग्रेस चे शहर अध्यक्ष अॅड अमजद पठाण,  जिल्हा अल्पसंख्यक सचिव इरफान मनियार, महीला जिल्हा सचिव कुसुम पाटील, उपाध्यक्षा संगिता नेवे, तालुका अध्यक्षा अॅड कविता पवार, कल्पना निंबाळकर, रेखा पाटील, सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे, तालुका अध्यक्ष कल्पेश येवले, शरीफ शेख, समाधान पाथरवट, रणजित पाटील, संजय सोनार, किशोर पाटील, आदी उपस्थित होते. ज्यांना अडचण आल्यास स्थानिक पातळीवरील शहरी व ग्रामीण भागातील कॉंग्रेस पदाधिकारी यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी केले आहे.