आरोग्यदुत न्युज
वरणगाव प्रतिनिधी-सुनिल पाचपोळ
दि,६/७/२०२१
भाजपाचे वरणगाव मध्ये चक्काजाम आंदोलन
काल विधिमंडळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या बारा आमदारांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी वरणगाव यांच्यावतीने वरणगाव येथील बस स्टँड चौकामध्ये चक्का जाम आंदोलन करण्यात आले
माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांच्या नेतृत्वाखाली वरणगाव येथील बस स्टॅन्ड चौकामध्ये रस्ता रोको करत चक्काजाम आंदोलन करण्यात आले यावेळी हा विकास आघाडी सरकारच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली बारा आमदारांचा निलंबित तात्काळ रद्द करा अशा प्रकारच्या घोषणा या वेळी देण्यात आल्या यावेळी काही काळ बस स्टॅन्ड चौकामध्ये वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.
भाजपाचे जिल्हा चिटणीस राजेंद्र चौधरी,माजी नगराध्यक्ष सुनील काळे,भाजपा शहराध्यक्ष सुनील माळी,,उपनगराध्यक्ष शेख आखलाक, भाजपा महिला मोर्चा शहराध्यक्षा सौ.प्रणिता पाटील-चौधरी, सौ.जयश्री अवतारे,सौ.वर्षा बढे,सुभाष धनगर,गोलू राणे,नटराज चौधरी,हितेश चौधरी,दिपक चौधरी,मिलिंद भैसे,साबीर कुरेशी,डॉ सादिक,शेख युसुफ खान,भाजयुमो शहराध्यक्ष संदीप भोई,अल्पसंख्याक आघाडी शहराध्यक्ष डी.के.खाटीक,प्रताप दिव्यवीर, कृष्णा माळी,गजानन वंजारी, योगेश माळी,जय चांदणे,बाळूदादा कोळी,संदीप वाघ,संदीप माळी,इरफान पिंजारी,पप्पू ठाकरे,ज्ञानेश्वर घाटोळे,शंकर पवार,साबीर कुरेशी
यावेळी आंदोलनाला असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.