जळगाव- राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.        

0
528

आरोग्यदुत न्युज
चंद्रशेखर सातदिवे
जळगाव जिल्हा (प्रतिनिधी)
दि,७/७२०२१

पालकमंत्री गुलाबराव पाटील जिल्हा दौऱ्यावर
जळगाव- राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
बुधवार, दि. 7 जुलै, 2021 रोजी रात्री 8.48 वा. जळगाव रेल्वे स्टेशन येथे आगमन. रात्री 8.55 वा जळगाव रेल्वे स्टेशन येथून पाळधी, ता. धरणगाव कडे प्रयाण व राखीव.
गुरुवार, दि. 8 जुलै, 2021 रोजी सकाळी 10.00 वाजता पाळधी येथे अभ्यांगत व कार्यकर्त्यांच्या भेटी व चर्चा. सकाळी 10.30 वाजता पाळधी, ता. धरणगाव येथून अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव कडे प्रयाण. सकाळी 10.45 वाजता अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे आगमन व राखीव. सकाळी 11.15 वाजता अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथून पद्मालय भोजनालयाच्या बाजूचे डॉ. खुशाल जावळे यांचे साईकमल मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पीटलच्या उद्घाटनास उपस्थिती. सकाळी 11.45 वाजता जळगाव शहर व तालुक्यातील नियोजित कार्यक्रमास भेटी. दुपारी 1.00 वाजता पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव. दुपारी 4.30 वाजता धरणगाव तालुक्यातील विविध गावांतील नियोजित कार्यक्रमास भेटी व उपस्थिती. सोईनुसार पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव.