नाथाभाऊ भिऊ नका- सामाना करा या ईडीचा.अख्खा बहुजन समाज आपल्या पाठीशी(अनिल महाजन ओबीसी नेते & प्रदेश अद्यक्ष महाराष्ट्र माळी समाज महासंघ)

0
191

नाथाभाऊ भिऊ नका- सामाना करा या ईडीचा.अख्खा बहुजन समाज आपल्या पाठीशी(अनिल महाजन ओबीसी नेते & प्रदेश अद्यक्ष महाराष्ट्र माळी समाज महासंघ)
एकनाथराव खडसे हे ईडी ला घाबरणारे व्यक्ती नाहीत ईडीला पाणी पाजून येणारे नेते आहेत — अनिल महाजन ओबीसी नेते & प्रदेश अद्यक्ष महाराष्ट्र माळी समाज महासंघ
भाजपा ला त्यांच्या पक्षाचे 12 आमदार निलंबित झालेले चांगलेच जिव्हारी लागलेलं दिसतंय
नाथाभाऊ भिऊ नका- सामाना करा या ईडीचा.अख्खा बहुजन समाज आपल्या पाठीशी आहे शरद पवार साहेब तुमच्या सोबत आहे
ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी ओबीसीचे नेते छगनजी भुजबळ यांनी विधानसभेत ठराव पास करण्यासाठी प्रस्ताव मांडला नेमका याच वेळी आपल्या अकलेचे तारे तोडत समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी व फक्त राजकारण करण्यासाठी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी हरकतीचा मुद्दा मांडला कुठलाही ओबीसीचा अभ्यास नसताना ओबीसी समाजाची माहिती नसतांना फक्त विनाकारण गोंधळ घालत ओबीसींच्या प्रश्न कसा रेंगाळत राहावा हेच आतापर्यंत खेळी भाजपाने केली आहे.
ओबीसीच्या समाजाच्या जीवावरच भाजप सत्तेत आला आणि उलट ओबीसी लाच त्रास देत आहे. विधान मंडळात घटना घडली ओबीसी आरक्षण प्रस्ताव वरून सरळ सरळ। ह्या ओबीसीच्या प्रस्तावाला भाजप सपोर्ट करू शकत नव्हता कारण भाजपा ची विचार सरणी ओबीसी विरोधात आहे म्हणून त्यांची विरोधकांची जिव्हारी आली
आणि विधानभवन च्या बाहेर येऊन यांचे लोक मीडियामध्ये सांगतात की आम्ही ओबीसीच्या बाजूने होतो म्हणून आमचे १२ आमदार निलंबित केले. अरे कधीतरी सत्य बोला किती खोटं बोलता हे महाराष्ट्राच्या जनतेला कळत आहे खरंच तुम्हाला ओबीसी बद्दल प्रेम असले असते तर आज केंद्रीय मंत्रिमंडळात जो विस्तार झाला त्यामध्ये का ओबीसी समाजाच्या खासदारांना मंत्री केले नाही.
तिकडे तर तुम्ही इतर लोकांना मंत्री केलात का पंकजा मुंडे यांना राज्यसभा दिली नाही प्रीतम मुंडे यांना केंद्रात मंत्रीपद दिली नाही कारण खरे ओबीसी तुम्हाला चालत नाही हे उघड सत्य आहे.
भारतीय जनता पार्टीच्या 12 आमदार विधान भवनात कालच निलंबित झाले.आणि आज तडका फडकी आज लगेच एकनाथराव खडसे यांच्या जावयांना अटक केली. इडी ने म्हणजेचं केंद्रीय तपास यंत्रणा या भाजपाच्या इशाऱ्यावर कसे काम करत आहे. सत्तेचा खरा दुरुपयोग महाराष्ट्राच्या भाजपच्या नेत्यांचा सांगण्यावरून केंद्राचे सत्ताधारी कसे करत आहेत. ही महाराष्ट्र ची जनता बघत आहे.
आज एकही पत्रकार एकही विचारवंत एकही लेखक भारतीय जनता पार्टीचे विरोधात लिहित नाहीये लिहिलं की लगेच त्याच्या मागे काहीतरी लावायचे हाच प्रकार सध्या महाराष्ट्रात सुरू आहे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनाही ईडी ने लगेच समनस बजावला आहे एकनाथराव खडसे हे तुफानी नेतृत्व आहे.
कितीही वादळ आले तरी हे खडसे नावाचं वादळ कोणी हलवू शकणार नाही. एकनाथराव खडसे म्हणजे या महाराष्ट्राचा शोषीत पीडित वंचितांचा आवाज आहे योग्य वेळ आल्यावर विरोधकांना एकनाथ खडसे उत्तर देणारच ते कशा पद्धतीने देणार हे महाराष्ट्राच्या जनतेला चांगले माहित आहे.
त्यामुळे आजपर्यंत जे जे एकनाथ खडसे यांच्या नांदी लागले आहेत योग्य वेळी एकनाथ खडसे यांनी त्यांचा त्यांनी भुईसपाट केला आहे.देवेंद्र फडणवीस जी अजुनही वेळ गेली नाही आता तर १२ आमदार निलंबित झाले आहेत तुम्ही अजून सावरले नाही तर पुढे अनेक असेच राजकीय गंभीर घटना होण्याची शक्यता आहे ? ९४ मध्येही काही कमी होतील कदाचित फक्त अर्धशतक तुमच्याकडे राहील त्यामुळे सौम्य पद्धतीने राजकारण करा आक्रमक पणा दूर ठेवा आणि एक आता जनतेला कळले आहे की भाजपा चा अजेंडा ओबीसी विरोधी आहे