भुसावळ-राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर भीषण अपघात दोन तरुणांचा मृत्यू

0
759

आरोग्यदुत न्युज
वरणगाव प्रतिनिधी सुनील पाचपोळ
दि,१२/७/२०२१
भुसावळ-राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर भीषण अपघात दोन तरुणांचा मृत्यू
महामार्गावरील जाडगाव फाट्याजवळ भरधाव ट्रकने मोटारसायकलला धडक दिल्यामुळे पिंपळगाव बुद्रुक चे दोन तरुण ठार झाल्याची घटना दुपारी 4 – 30 मिनिटांनी घडली सविस्तर असे की सुरेश श्रीपत पवार माजी सैनिक सुरक्षारक्षक दिपनगर  निंभोरा येथे नातेवाईकाची भेट घेण्यासाठी हे दोघं युवक आले होते.
व काही वेळ थांबून परतीच्या वाटेवर आपल्या पिंपळगाव गावी निघाले असता ट्रकच्या जोरदार धडक झाल्यामुळे एकाचा ट्रकच्या चाकाखाली येऊन तर दुसऱ्याचा वरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात नेत असतानाच वाटेतच मृत्यू झाला आहे.
पिंपळगाव बुद्रुक येथील रहिवासी  सचिन सुभाष मावळे वय १९ शिक्षण ११ वी
व सोपान रमेश मावळे वय २० शिक्षण १२ वी  या दोघा तरुणांची घरची परिस्थिती हलाखीची  असून त्यांच्या अशा अकस्मात झालेल्या मृत्यूमुळे संपूर्ण गावात व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
निंबोरा येथून मोटर सायकल नं एम एच सी टी ४७९८ वरणगाव च्या दिशेने येत असताना  वरणगाव येथून माल  ट्रक  क्रं एम एच १५ एफ व्हि १४१३ भुसावळच्या दिशेने निघाली असता वाहन चालकाने भरधाव वेगाने वाहन चालवत दुर्लक्ष करून समोरून येणाऱ्या मोटर सायकलला जोरदार धडक देऊन तरुणांच्या मृत्यूस व मोटार सायकल व ट्रक यांच्या नुकसानीस कारणीभूत असून
सदर होऊन ट्रकचालक याने पोलीस स्टेशनला खबर न देता पळून गेला असुन
वरणगाव पोलीस स्टेशन येथे ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला असून
अधिक तपास मनोहर पाटील करीत आहे.