भुसावळ- तालुक्यातील हतनूर येथे वरणगाव पोलिसांची धडक कारवाई ८० हजाराचा गावठी दारू बनवण्याचा कारखाना केला उध्वस्त.

0
585

आरोग्यदुत न्युज
दि,१२/७/२०२१
वरणगाव प्रतिनिधी- सुनील पाचपोळ
भुसावळ- तालुक्यातील हतनूर येथे वरणगाव पोलिसांची धडक कारवाई ८० हजाराचा गावठी दारू बनवण्याचा कारखाना केला उध्वस्त.
भुसावळ तालुक्यातील हतनुर हा भाग तापी पूर्णा नदीचा पट्टा म्हणून ओळखला जातो या नदीकिनारी हातभट्टी दारू बनवण्याचे अनेक भट्ट्या कार्यरत आहेत झाडाझुडपांच्या आतमध्ये या दारू बनवण्याचे काम दररोज सुरू असते या भट्ट्याची गोपनीय माहिती मिळताच वरणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कुमार बोरसे यांनी काही पोलिस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट देत हातभट्टी बनवण्याच्या उध्वस्त केल्या व या ठिकाणी सत्तर ते ऐंशी हजाराच्या रसायन नष्ट केले त्यामुळे परिसरातील हातभट्टी बनवणार यांचे धाबे दणाणले आहे.
वरणगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी  संदीप कुमार बोरसे ASI श्री नरसिंग चव्हाण पो, कॉ श्री अतुल बोदडे होम, गजानन चव्हाण, बापू सुतार मिस्त्री हजर होते.