पाळधी गावाजवळ भीषण अपघात. ३ जण ठार.

0
1032

आरोग्यदुत न्युज
चंद्रशेखर सातदिवे
जळगाव जिल्हा (प्रतिनिधी)
दि,१२/७/२०२१
जामनेर तालुक्यातील पाळधी गावाजवळील बळीराजा हॉटेल जवळ भीषण अपघात झाला असून या अपघातात भराडी येथील चारचाकी वाहक प्रविण प्रकाश पाटील वय ३८ तर जळगाव येथील दुचाकी वरील पंकज मोहन तायडे वय ३२ रा.कला वसंत नगर, असोदा रेल्वेगेट तर दुसरा व्यक्ती धनंजय गंगाराम सपकाळे वय ४२ रा. स्टेट बँक कॉलनी जळगाव या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
फॉरचून फायनान्स बँकेचे शाखा व्यवस्थापक धनंजय सपकाळे व सेल्स एक्झिक्युटिव्ह पंकज तायडे हे शेंदुर्णी येथून एम एच 19 डी आर 1419 या युनिकॉर्न दुचाकी वाहनाने बँकेचे कामकाज आटोपून जळगाव जात असताना पाळधी येथील बळीराजा हॉटेल जवळ जळगाव कडून येणारी चारचाकी एम एच १९ सी यू ७१६१ या वाहनाने दुचाकीला इतक्या जोरदा धडक दिली की अपघातात दुचाकीस्वारासह मागे बसलेल्या व्यक्तीचे हात, पाय हे शरीरापासून वेगळे तुकडे होऊन रस्त्यावर पडलेले होते.
याप्रकरणी पहूर पोलिसांनी घटना स्थळी पोहचून पंचनामा करून पुढील कारवाई करीत आहे.