नाशिक विभागीय भरारी पथकाची परराज्यातील अवैद्य मद्य तस्करी वाहतुक विरोधात कारवाई एक कोटीपेक्षा अधिक रक्कमेचा मुद्देमाल जप्त.

0
471

आरोग्यदुत न्युज                                                             

चंद्रशेखर सातदिवे
जळगाव जिल्हा (प्रतिनिधी)
दि 13 जुलै, 2021

नाशिक विभागीय भरारी पथकाची
परराज्यातील अवैद्य मद्य तस्करी वाहतुक विरोधात कारवाई
एक कोटीपेक्षा अधिक रक्कमेचा मुद्देमाल जप्त
जळगाव – निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, विभागीय भरारी पथक, नाशिक विभाग, नाशिक या पथकाने दिनांक 11 जुलै, 2021 रोजी एस.एस.चौधरी ढाब्याच्या बाजुला चाळीसगाव-औरंगाबाद रोडवर, बोढरे फाटयाजवळ, सांगवी शिवार, चाळीसगाव जिल्हा जळगाव या ठिकाणी वाहन तपासणी कामी सापळा रचून महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधीत असलेले तसेच गोवा राज्यनिर्मित व विक्रीकरिता असलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अशी माहिती निरिक्षक, राज्य उत्पादन शुल्क, विभागीय भरारी पथक, नाशिक यांनी दिली आहे.
त्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून गुन्हा रजिस्टर क्रमांक 165/2021, दिनांक 11 जुलै, 2021 रोजी परराज्यातील विदेशी मद्य – रॉयल ब्ल्यु माल्ट व्हिस्की 180 मि.ली. क्षमतेच्या 60480 बाटल्या (1260 बॉक्स). इतर साहित्य- मद्यसाठा ठेवण्याकरिता बनवलेले 6 प्लायवुडचे बॉक्स. एक सॅमसंग कंपनीचा एन्ड्रॉइड मोबाइल व एक सॅमसंग कंपनीचा साधा मोबाइल गुन्हयाकामी वापरण्यात आलेला आहे. 2 ताडपत्री. वाहन – टाटा मोटर्स लिमीटेट कंपनी निर्मित मॉडेल क्रमांक एलपीटी 3118 टीसी 8X2 बी.एस.3 बारा चाकी ट्रक जिचा प्रादेशिक परिवहन क्रमांक MP-09-HG-9354. जप्त मुद्येमालाची किंमत 1 कोटी 3 लाख 1 हजार 200 इतकी एवढी आहे. आरोपीचे नांव- अजय कन्हैयालाल यादव, वय-41 वर्षे, राहणार 45/8 जवाहर मार्ग, प्रेमसुख सिनेमाजवळ, इंदौर, मध्य प्रदेश-452007 असे आहे.
या पथक मोहिमेत कांतीलाल उमाप, आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई. श्रीमती उषा वर्मा, संचालक (अं.व.द.) महाराष्ट्र राज्य, मुंबई. अर्जुन ओहोळ, विभागीय उप-आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, नाशिक विभाग, नाशिक. श्रीमती सिमा झांबरे, अधिक्षक, राज्य उत्पादन शुल्क, जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली ही पथक मोहिम राबविण्यात आली.
ही कायर्वाही विभागीय भरारी पथकाचे निरिक्षक सी.एच.पाटील, दुय्यम निरिक्षक एस.एस.रावते, ए.डी.पाटील, जवान गोकुळ शिंदे, विठ्ठल हाके, भाऊसाहेब घुले, युवराज रतवेकर यांनी यशस्वीरित्या पार पाडली. या कार्यवाहीकरिता चाळीसगाव येथील निरिक्षक के.डी.पाटील, अमळनेर येथील दुय्यक निरिक्षक आर.पी.दांगट, मालेगाव येथील दुय्यक निरिक्षक आर.टी.खैरे, जवान महेंद्र बोरसे, अण्णा बाहिरम, संजय सोनवणे, शशिकांत पाटील यांनी मदत केली. या गुन्ह्याचा पुढील तपास सी.एच.पाटील, निरिक्षक, विभागीय भरारी पथक, नाशिक विभाग, नाशिक हे करीत आहे.
अवैद्य मद्य निर्मीती, विक्री, वाहतुक या संदर्भात कोणतीही तक्रार असल्यास या विभागाच्या टोल फ्री क्रमांक 18008333333 व व्हॉटस् ॲप क्रमांक 8422001133 तसेच दुरध्वनी क्रमांक 0253-2319744 वर संपर्क साधावा. असे आवाहन निरिक्षक, राज्य उत्पादन शुल्क, विभागीय भरारी पथक, नाशिक विभाग, नाशिक यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.