जळगाव- पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी योजनेसाठी इच्छुकांनी ऑनलाईन प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन.

0
666

आरोग्यदुत न्युज
चंद्रशेखर सातदिवे
जळगाव जिल्हा (प्रतिनिधी)
दिनांक- 16 जुलै, 2021
जळगाव- पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी योजनेसाठी

इच्छुकांनी ऑनलाईन प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
जळगाव- केंद्र शासनाने पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी या नवीन योजनेस मंजूरी दिली असून सन 2021-22 या वर्षात या योजनेकरीता 15 हजार कोटींचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. शामकांत पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.
या योजनेअंतर्गत दुध प्रक्रिया (आइसक्रिम चीज निर्मिती, दुध पाश्चराझेशन, दुध पावडर, इत्यादी) मांस, निर्मिती व प्रक्रिया, पशुखाद्य, टीएमआर ब्लॉक्स, बायपास प्रोटीन, खनिज मिश्रण, मुरघास निर्मिती, पशुपक्षी खाद्य विश्लेषण प्रयोगशाळा या उद्योग व्यवसायांना 90 टक्के कर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तर व्याज दरामध्ये 3 टक्के सुट देण्यात येणार आहे. या योजनेच्या सर्व मार्गदर्शक सुचना, योजनेसंदर्भात उपस्थित होणारी प्रश्नोत्तरे, योजनेसाठी ऑनलाईन पध्दतीने सादर करावयाच्या अर्जाचा नमुना आणि आवश्यक  कागदपत्रांची यादी केंद्र शासनाच्या पशुपालन व डेअरी विभागाच्या http://dahd.nic.in/ahdf या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
या योजनेच्या लाभासाठी संकेतस्थळावरील पोर्टलव्दारे ऑनलाईन प्रस्ताव सादर करावयाचा आहे. प्रस्ताव सादर करण्याची लिंक पशुसंवर्धन विभागाच्या http://ahd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर देण्यात आलेली आहे.
केंद्र शासनाने वरील नमुद उद्योग व्यवसायासोबतच लिंग विनिश्चित वीर्यमात्रा निर्मिती, बाह्यफलन केंद्र (आयव्हीएफ) पशुधनाच्या शुध्द वंशावळीच्या प्रजातींचे संवर्धन या बाबींचाही समावेश केलेला आहे. या योजनेचा व्यक्तीगत व्यावसायीक, शेतकरी उत्पादक संस्था, खाजगी संस्था, कलम-8 अंतर्गत स्थापन झालेल्या कंपनी यांना लाभ घेता येईल.
पशुपालन व दुग्ध व्यवसायाच्या प्रगतीसाठी केंद्र शासनाचा पशुसंवर्धन पायाभुत सुविधा विकास निधी उपयुक्त असून जळगाव जिल्ह्यातील इच्छुक व्यावसायीक, उद्योजक व संस्था यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. शामकांत पाटील आणि जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. अविनाश इंगळे, जिल्हा परिषद, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.