आरोग्यदुत न्युज
एन एस भुरे (संपादक)
दि,16/7/2021
शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वात व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या मार्गदर्शना खाली
ओबीसी नेते अनिल महाजन राज्यभर दौरा करणार
पुरोगामी विचार सरणीचे नेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या नेतृत्वात व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या मार्गदर्शना खाली ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण बचाव जनलढा उभारण्यासाठी जनसंपर्क अभियान ची सुरवात होत आहे. ओबीसी नेते अनिल महाजन राज्यभर दौरा करणार आहे. ओबीसी समाजाला जागृत करण्यासाठी प्रयत्न असणार आहे.
सद्या महाराष्ट्र मध्ये चर्चेला असणारा मुद्दा म्हणजे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाले त्याबाबत अनेक सामाजिक,राजकीय संघटनांनी मोर्चे आंदोलन सुरू केले आहे पण गेली पाच वर्षपासून ओबीसी समाजाला संघटन करून जागृत करण्याचे काम महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे प्रदेश अध्यक्ष व ओबीसी जनक्रांती परिषद चे संस्थापक अध्यक्ष अनिल भाऊ महाजन हे करत आहेत.
ओबीसी समाजाचा अतिशय गाढा अभ्यास यांचा आहे ओबीसी समाजातील तरुणांमध्ये अतिशय उत्तम संघटन कौशल्य अनिल महाजन यांचे आहे एक मोठा झंझावात राज्यात ओबीसी समाजामध्ये यांनी निर्माण केला आहे माजी मंत्री राष्ट्रवादी चे नेते एकनाथ खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली व आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या नेतृत्वात राज्यभर *ओबीसी राजकीय आरक्षण बचाव जनसंपर्क अभियान ची सुरवात महाराष्ट्र मध्ये करण्यात येत आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सर्व ओबीसी समाजातील घटकांना एकत्र करून लढा उभारण्यात येणार आहे असे यावेळी अनिल महाजन यांनी बोलतांना सांगीतले.
व्ही पी सिंग यांचे सरकार केंद्रात असतांना मंडल कमिशन लागू करण्यात आले होते त्याची अंमलबजावणी आदरणीय शरद पवार साहेब मुख्यमंत्री असतांना ह्या बारामतीच्या वाघानेच सर्वात अगोदर ओबीसी समाजाला न्याय दिला आहे छगन भुजबळ यांच्या मागणी वरून आणि पुढेही हेच शरद पवार साहेब नाथाभाऊ खडसे ओबीसी समाजासाठी देवदूत ठरतील यात काहीही एक शंका नाही
बहुजनांचे नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या मार्गदर्शनखाली ओबीसी नेते अनिल भाऊ महाजन हे राज्यभर लवकरच दौऱ्यावर निघणार आहेत ओबीसी समाजाच्या राजकीय रद्द झालेले आरक्षण पुन्हा सुरू करावे यासाठी बारा बलुतेदार,आलुतेदार ओबीसी समाजाला जागृत करण्यासाठी जनलढा उभारण्यासाठी ओबीसी राजकीय आरक्षण बचाव जनसंपर्क अभियान लवकरच सुरू करण्यात येत आहे.
Home ताज्या घडामोडी शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वात व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या मार्गदर्शना...