पाचोरा- सर्पतज्ज्ञ मा.श्री.निलमकुमार खैरे यांचे पाचोरा येथे सर्पमित्रांचे मार्गदर्शन शिबीर संपन्न.

0
280

आरोग्यदुत न्युज
एन एस भुरे (संपादक)
दिनांक~१६/०७/२०२१
पाचोरा येथील निसर्गराजा न्यूजचे संपादक व वेब मिडिया असोसिएशन पदाधिकारी मा.श्री. आतिषजी चांगरे यांनी जागतिक सर्पमित्र दिनाचे औचित्य साधून आपल्या तालुक्यातील व परिसरातील सर्पमित्रांना साप पकडणे, सापांच्या विविध जातींची ओळख होऊन प्रत्येक जातीच्या सापाचे गुणधर्म व विविध विषयांवर जास्तीतजास्त माहिती मिळावी याकरिता महाराष्ट्राचे प्रसिद्ध सर्पतज्ञ मा.श्री. निलमकुमार खैरे यांना पाचोरा नगरीत आणून सर्पमित्रांसाठी कार्यशाळेचे आयोजन स्व.राजीव गांधी हॉलमध्ये केले होते. या मागचे कारण म्हणजे अतिषजी चांगरे यांना लहानपणापासून निसर्ग, वन्यप्राणी व वन्यजीव यांच्याबद्दल आवड व जिव्हाळा आहे. त्यांनी आजपर्यंत हजारो सापांना जीवदान दिले असून अपघाताने किंवा घातपाताने जखमी किंवा जायबंदी झालेल्या माकड, हरिण, नीलगाय, रानडुक्कर, या शेकडो जंगली प्राण्यांना स्वखर्चाने उपचार करुन जीवदान देऊन परत जंगलात नेऊन सोडले आहेत. ते येथेच थांबले नसून जंगलाचे रक्षण करण्यासाठी व वनसंपत्ती वाढवण्यासाठी ते प्रयत्नशील असतात याकरिता ते झाडे लावा झाडे जगवा शिकार बंदी असे विविध उपक्रम राबवून जनजागृती करत असतात. म्हणून त्यांनी आज कार्यशाळेचे आयोजन केले होते.
या कार्यशाळेच्या सुरवातीला आलेल्या पाहुण्यांचा सत्कार पाचोरा वेब मिडिया असोसिएशन तर्फे शाल,श्रीफळ देऊन करण्यात आला.
या कार्यशाळेत सर्पतज्ञ मा.श्री. निलमकुमार खैरे यांनी मार्गदर्शन केले.
यात जागतिक सर्प दिवस का साजरा केला जातो या दिनाचा इतिहास, अर्थ आणि महत्त्व! जागतिक सर्प दिवस जगभरातील सापाच्या वेगवेगळ्या प्रजातींविषयी जागरूकता वाढवण्यासाठी साजरा केला जातो. असे सांगितले.
जागतिक सर्प दिवस; जाणून घ्या या दिनाचा इतिहास, अर्थ आणि महत्त्व!
जागतिक सर्प दिवस जगभरातील सापाच्या वेगवेगळ्या प्रजातींविषयी जागरूकता वाढवण्यासाठी साजरा केला जातो.
जागतिक सर्प दिवस; जाणून घ्या या दिनाचा इतिहास, अर्थ आणि महत्त्व!
जागतिक सर्प दिवस जगभरातील सर्पांच्या विविध प्रजातींविषयी जागरूकता वाढवण्यासाठी साजरा केला जातो. बरेच लोक सापांना घाबरतात. तरीही साप हा एक महत्त्वाचा प्राणी आहे. आपण राहतो त्या इकोसिस्टमसाठी साप महत्त्वाचे आहेत. सापांकडे त्यांचे संरक्षण स्वतःच करण्याचे तंत्र आहे. त्यांचे दात ते त्यांच्या विषारी विषासाठी वापरतात. लोकांना या सरीसृपांबद्दल आणि ते जगाला कशाप्रकारे योगदान देतात याविषयी अधिक जाणून घेण्यास मदत करण्यासाठी जागतिक सर्प दिन तयार केला गेला. जागतिक साप दिवस साजरा करण्यासाठी आणि त्यांचा रूपाविषयी आणि ते कसे जगतात याबद्दल जागरूकता करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
जागतिक सर्प दिवसाचा इतिहास
साप हा आतापर्यंत अस्तित्वात असणाऱ्या सर्वात प्राचीन जीवांपैकी एक आहे. साप जगातील विविध संस्कृतींमध्ये अस्तित्वात आहे. उत्तर कॅनडाच्या अर्ध-गोठलेल्या टुंड्रापासून ते अॕमेझॉनच्या हिरव्या जंगलांपर्यंत सापाच्या सुमारे ४५,४५८८ प्रजाती आहेत. साप जगातील बहुतेक समुद्रांमध्ये देखील आढळतात. ते निसर्गाचा समतोल राखण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. सापांमध्येही विविधता असते. त्यांच्या काही जाती दिसण्यायला फार मोहक असतात.
तसेच जागतिक सर्प दिवस जगभरातील सर्पांच्या विविध प्रजातींविषयी जागरूकता वाढवण्यासाठी साजरा केला जातो. बरेच लोक सापांना घाबरतात. तरीही साप हा एक महत्त्वाचा प्राणी आहे. आपण राहतो त्या इकोसिस्टमसाठी साप महत्त्वाचे आहेत. सापांकडे त्यांचे संरक्षण स्वतःच करण्याचे तंत्र आहे. त्यांचे दात ते त्यांच्या विषारी विषासाठी वापरतात. लोकांना या सरीसृपांबद्दल आणि ते जगाला कशाप्रकारे योगदान देतात याविषयी अधिक जाणून घेण्यास मदत करण्यासाठी जागतिक सर्प दिन तयार केला गेला. जागतिक साप दिवस साजरा करण्यासाठी आणि त्यांचा रूपाविषयी आणि ते कसे जगतात याबद्दल जागरूकता करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
सध्या सगळीकडे जंगलतोड, हवामानातील बदलयामुळे सापाच्या अधिवासात घट होण्यासारखी परिस्थिती झाली आहे. त्यांचे हित जपण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे. अंटार्क्टिका वगळता सर्व खंडात साप, समुद्र, जंगले, वाळवंट इथे आढळतात. कीटक, लहान उंदीर आणि बेडूक यासह साप वेगवेगळ्या प्राण्यांचा वापर अन्न म्हणून करतात. साप त्यांचा शिकार संपूर्ण खातात. काही फार मोठे साप अगदी लहान हरिण, डुकर, माकड खाऊ शकतात. अशी माहिती दिली.
या प्रसंगी पाचोरा वेब मिडीया असोसिएशनचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.