भडगाव- सौ. सु. गि. पाटील माध्यमिक विद्यालय व सौ. ज. ग. पूर्णपात्री कनिष्ठ महाविद्यालय, भडगांव येथे एस.एस.सी. परीक्षेत उत्तुंग यश मिळवलेल्या गुणवंतांचा गौरव सोहळा संपन्न

0
187

आरोग्यदुत न्युज
एन एस भुरे (संपादक)
दि,१९/७/२०२१
भडगाव- सौ. सु. गि. पाटील माध्यमिक विद्यालय व सौ. ज. ग. पूर्णपात्री कनिष्ठ महाविद्यालय, भडगांव येथे एस.एस.सी. परीक्षेत उत्तुंग यश मिळवलेल्या गुणवंतांचा गौरव सोहळा संपन्न
आज दिनांक 19 जुलै 2021 रोजी विद्यालयात गुणवंतांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (S.S.C.) मार्च २०२१ मध्ये विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला असून या परीक्षेत घवघवीत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.
S.S.C. परीक्षेत विद्यालयातून उज्ज्वल यश संपादन केलेले अनुक्रमे 1 ते 5 विद्यार्थी पुढील प्रमाणे आहेत.
१.  सोनजे शमिका नितीन – ९८%
२. पाटील प्राची जयवंत – ९४.६०%
३. घोडके कुमुदिनी शामकांत – ९४.२३%
४. भोसले ऋतुजा ऋषिकेश – ९३.००%
५. सुरवाडे संवेद्य धम्मपाल – ९०.२०%
वरील सर्व गुणवंत विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना विद्यालयात आमंत्रित करून त्यांचा मान्यवरांच्या हस्ते गुलाब पुष्प व पेढे देऊन गुणगौरव करण्यात आला.
कार्यक्रमास शालेय समितीचे चेअरमन आबासो. दत्तात्रय पवार, कनिष्ठ महाविद्यालयाचे चेअरमन बाबासो. विनय जकातदार, ज्येष्ठ संचालक व माजी मुख्याध्यापक श्री. ग. ल. पूर्णपात्री, तात्यासो. नवल पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यालयाच्या वतीने सर्व उपस्थित मान्यवरांचे व पालकांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. या प्रसंगी विद्यार्थी व पालकांनी आपले मनोगत व्यक्त करून शिक्षकांचे ऋण व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात आबासो. दत्तात्रय पवार यांनी विद्यार्थी आणि पालकांना बहुमोल मार्गदर्शन केले. तर मुख्याध्यापक/ प्राचार्य श्री. विश्वासराव साळुंखे यांनी विद्यार्थ्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्याध्यापक श्री. के. एस. पाटील यांनी केले. आभार प्रदर्शन पर्यवेक्षक श्री. एस. एम. पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक श्री. शरद महाजन यांनी केले.
सदर कार्यक्रमास पर्यवेक्षक श्री. अरुण पाटील, उपप्राचार्य श्री. संदीप सोनवणे तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू- भगिनी उपस्थित होते.