जळगाव- पालकमंत्री गुलाबराव पाटील शनिवारी जिल्हा दौऱ्यावर

0
642

आरोग्यदुत न्युज
चंद्रशेखर सातदिवे
जळगाव जिल्हा (प्रतिनिधी)
दि,२३/७/२०२१
पालकमंत्री गुलाबराव पाटील शनिवारी जिल्हा दौऱ्यावर

जळगाव- राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
शनिवार, दि. 24 जुलै, 2021 रोजी सकाळी 8.00 वाजता पाळधी येथे अभ्यांगत व कार्यकर्त्यांच्या भेटी व चर्चा. सकाळी 10.00 वाजता पाळधी, ता. धरणगाव येथून अमळनेरकडे प्रयाण, दुपारी 11.00 वाजता अमळनेर येथे आगमन व अमळनेर येथील पोलीस पाटील मेळाव्यास उपस्थिती. दुपारी 12.00 वाजता अमळनेर येथून नशिराबाद-कुऱ्हामार्गे ता. बोदवडकडे प्रयाण. दुपारी 2.00 वाजता बोदवड येथे आगमन व नियोजित कार्यक्रमास भेटी व उपस्थिती. सायंकाळी 5.00 वाजता बोदवड येथून ता मुक्ताईनगरकडे प्रयाण. सायंकाळी 5.15 वाजता मुक्ताईनगर येथे आगमन व नियोजित कार्यक्रमास उपस्थिती, सोईनुसार पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव.