श्री.अनिल भाऊ महाजन व पाचोरा न.पा.प्रशासन अधिकाऱ्यांची बैठक संपन्न.

0
358

आरोग्य दूत न्यूज
एन एस भुरे (संपादक)
दिनांक २३/७/२०२१
श्री.अनिल भाऊ महाजन व पाचोरा न.पा.प्रशासन अधिकाऱ्यांची बैठक संपन्न.
बैठकीला विशेष- उपस्थिती पाचोरा न.पा.मुख्याधिकारी शोभा बाविस्कर मॅडम, नगराध्यक्ष छोटू गोहिल, ए.एम फाऊंडेशनचे अध्यक्ष अनिल भाऊ महाजन, मुकुंद आण्णा बिल्दिकर, कॉन्ट्रॅक्टर मनोज पाटील, माजी नगरसेवक दत्ता बोरसे,न.पा इंजिनियर जयस्वाल.
पाचोरा कृष्णापुरी हिवरा नदीवरील पूलाची उंची वाढवण्यासाठी सदर पुलाचे बांधकाम पाचोरा नगरपरिषदने सुरू केले आहे. त्यामुळे सर्व रस्ता बंद केला आहे. पांचलेश्वर येथील पर्यायी मार्ग सुरू आहे.अशी माहिती न.पा प्रशासन यांनी सांगितली.
अतिशय सविस्तर टेक्निकली चर्चां सदर बैठकीत झाली. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे नदीला आलेला पूर बाबत आगामी घडणाऱ्या घटनांचा ही विचार करण्यात आला.  कोणाची जीवित हानी होऊ नये याची ही काळजी घेण्यात आली. यावेळी कॉन्ट्रॅक्टर मनोज पाटील व न.पा मुख्य अधिकारी बाविस्कर मॅडम व इंजिनियर जयस्वाल साहेब यांनी सांगितले तीन महिन्यात पुलाचे बांधकाम आम्ही पूर्ण करून देऊ.
पुलाचे बांधकाम सुरू झाल्यावर नंतर गाड्या येण्या जाण्यासाठी तात्पुरता स्वरूपात रॅम देखील टाकण्यात येणार आहे. त्या रॅम वरून पाई जाणाऱ्या लोकांना रस्ता वापरता येईल अशी ग्वाही ठेकेदार मनोज भाऊ पाटील यांनी दिली. यावेळी कृष्णापुरी येथील स्थानिक रहिवाशी भरत मिस्तरी, एड. शांतिलाल सैदाने व काही स्थानिक नागरिक उपस्थित होते.नगराध्यक्ष छोटू गोहिल,माजी नगरसेवक दत्ता बोरसे,मुकुंद आण्णा बिल्दिकर उपस्थित होते. अतिशय सामंजस्य पणाने बैठक संपन्न झाली. चर्चा करण्यात आली चर्चे दरम्यान अनिलभाऊ महाजन व स्थानिक नागरिक यांचे समाधान झाल्यामुळे अनिल महाजन यांनी ए.एम फाऊंडेशनच्या वतीने आंदोलनाचा  दिलेला इशारा मागे घेण्यात आला यावेळी अनिल भाऊ महाजन यांनी पाचोरा न.पा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सहकार्य केल्या बद्दल सर्व अधिकाऱ्याचे आभार मानले.
आपल्या गावचे भूमिपुत्र अनिल भाऊ महाजन हे व्यवसाय निम्मिताने मुबंईला राहून सुद्धा आपल्या गावाबद्दल आपुलकीने लक्ष देतात यामुळे स्थानिक नागरिकांना मध्ये अनिलभाऊ महाजन यांच्या कामाचे अभिनंदन होत आहे.