जळगाव- तालुकास्तरीय महिला लोकशाही दिनाचे 26 जुलै रोजी ऑनलाईन आयोजन.

0
142

आरोग्यदुत न्युज
चंद्रशेखर सातदिवे
जळगाव जिल्हा (प्रतिनिधी)
दि,२३/७/२०२१

तालुकास्तरीय महिला लोकशाही दिनाचे

26 जुलै रोजी ऑनलाईन आयोजन

जळगाव- समस्याग्रस्त व पीडीत महिलांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे, तसेच त्यांच्या हक्काचे संरक्षण होवून त्यांना न्याय मिळावा. यादृष्टीने महिलांच्या तक्रारी/अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी व समाजातील पिडीत महिलांना मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून महिला लोकशाही दिन तालुकास्तरावर प्रत्येक महिन्याच्या चौथ्या सोमवारी राबविण्यात येतो. त्याअनुषंगाने या महिन्यातील तालुकास्तरीय महिला लोकशाही दिन सोमवार, 26 जुलै, 2021 रोजी ऑनलाईन आयोजित करण्यात आला आहे.
भडगाव तालुक्यातील महिलांनी त्यांच्या काही तक्रारी असल्यास त्या dvpobhadgaon@gmail.com या मेलवर तर चाळीसगाव तालुक्यातील महिलांनी dvpochalisgaon@gmail.com या मेलवर पाठवाव्यात. असे संबंधित तालुक्याचे बाल विकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.