आरोग्यदुत न्युज
चंद्रशेखर सातदिवे
जळगाव जिल्हा (प्रतिनिधी)
दिनांक :- 27 जुलै, 2021
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी
12 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
जळगाव- सन 2020-21 या शैक्षणिक वर्षात 10 वी,12 वी, पदव्युत्तर वैद्यकीय व अभियांत्रिकी इत्यादी अभ्यासक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना सरासरी 60% किंवा त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त झाले असतील, अशा मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील विद्यार्थी/विद्यार्थीनींना महामंडळाकडून ज्येष्ठता व जास्त गुण क्रमाकांनुसार जिल्ह्यातील प्रथम 3 ते 5 विद्यार्थ्यास निधीच्या उपलब्धतेनुसार शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात येणार आहे.
उपलब्ध निधीच्या अधीन राहून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती मंजुर करण्यात येते. तरी मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील विद्यार्थी/विद्यार्थीनीनी 12 ऑगस्ट, 2021 च्या आत संपूर्ण कागदपत्रांसह जिल्हा कार्यालयात संर्पक करावा. असे ताराचंद कसबे, जिल्हा व्यवस्थापक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, (मर्या) जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
अर्जासोबत पुढीलप्रमाणे मुळ कागदपत्रे दोन प्रतीत आणावीत. मार्कशीट, शाळा सोडल्याचा दाखला, रेशनकार्ड, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, आधारकार्ड, पुढच्या वर्गात प्रवेश घेतल्याची पावती किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट जिल्हा व्यवस्थापकांच्या नावे शिष्यवृत्ती मागणीचा अर्ज आदि कागदपत्रासह कार्यालयात संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक 0257-2263294 वर संपर्क साधावा. असेही श्री. कसबे यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
Home Uncategorized साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी 12 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन