पाचोरा शिंदे इंटरनॅशनल स्कुल सी.बी.एस.सी. इयत्ता दहावीचा निकाल १००% लागला

0
337

आरोग्यदुत न्युज
चिंतामन पाटील (प्रतिनिधी)
दिनांक ०३/०८/२०२१
पाचोरा शिंदे इंटरनॅशनल स्कुल सी.बी.एस.सी. इयत्ता दहावीचा निकाल १००% लागला
आज दिनांक ०३/०८/२०२१ मंगळवार रोजी सीबीएससी बोर्डाचा इयत्ता दहावी च्या विद्यार्थ्याचा निकाल जाहीर करण्यात आला. शिंदे इंटरनॅशनल स्कूल पाचोरा येथील शाळेत शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये एकूण ४८ मुलं परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते.
सर्व ४८ मुलं अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे पास झालेली आहेत. अशा तऱ्हेने शाळेचा निकाल १००% लागलेला आहे सदर मूल्यांकनात दिव्या संजीव चौधरी ह्या मुलीने ९५.४०% मिळवून प्रथम क्रमांक पटकावला तसेच हर्षाली सुधीर देवरे या विद्यार्थिनीने ९४.६०% मिळवून व्दितीय क्रमांक मिळविला आणि प्रेम गणेश खडे या विद्यार्थ्याने ९३% टक्के मिळून तिसरा क्रमांक ने पास झाला.
सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांच्या यशासाठी संस्थेचे, गिरणाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पंडितराव शिंदे, सचिव अॅडव्होकेट जे.डी. काटकर, संस्थेचे सह-सचिव शिवाजीराव शिंदे सर, सदस्य नीरज मुनोत सर तसेच शाळेचे प्राचार्य डॉक्टर विजय पाटील सर आणि शिक्षक वृंद यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.
सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी जीवनासाठी संस्थेच्या वतीने शुभेच्छा!