आरोग्यदुत न्युजचंद्र
शेखर सातदिवे
जळगाव जिल्हा (प्रतिनिधी)
दि,०६/८/२०२१
एस टी चालक गणेश बोदडे यांचे प्रसंगावधानामुळे वाचले 43 प्रवाशांचे प्राण
बुलडाणा. जळगांव जामोद आगारातील चालक गणेश वसंतराव बोदडे, बिल्ला क्रमांक 32178 यांच्या प्रसंगावधनामुळे बसमधील 43 प्रवाशांचे प्राण वाचले आहेत. श्री. बोदडे 22 जुलै रोजी नियम क्रमांक 14 राप बस क्रमांक एम.एच 40 एक्यु 6338 जळगाव जामोद ते अकोला प्रवास पूर्ण करीत होते. दरम्यान जळगाव जामोद येथून बस घेवून निघाले असतांना मानेगाव जवळ बसचे ब्रेकबुस्टर अचानक लिक होवून ब्रेक कमी लागले. बसमध्ये मार्गस्थ असताना बिघाड झाला. सदर बाब ही चालक श्री. बोदडे यांचे लक्षात येताच त्यांनी पूर्णा नदीवरील पुलापुर्वीच बस नियंत्रित केली व बस सुरक्षीत उभी केली. या प्रसंगावधामुळे बसमधील वाहक अनंता खोंद्रे यांच्यासह 43 प्रवाशांचे प्राण वाचले व होणारा मोठा अपघात टळला. त्यांच्या कामातील प्रामाणीकपणा व कार्यतत्परतामुळे राप महामंडळाची होणारी आर्थिक हानी टळली. त्यामुळे गणेश वसंतराव बोदडे, चालक बिल्ला क्र.32178 राप जळगाव जामोद यांचा दि.15 ऑगष्ट 2021 रोजी स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाच्या वेळी विभागीय कार्यालय, राप, बुलडाणा येथे सत्कार आयोजित करण्यात आला आहे, असे विभाग नियंत्रक रा.प. बुलडाणा यांनी कळविले आहे.