पूर्व उच्च प्राथमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 12 ऑगस्ट रोजी होणार

0
502
  • आरोग्यदुत न्युज
    चंद्रशेखर सातदिवे जिल्हा (प्रतिनिधी)
    दि,०६/८/२०२१
    पूर्व उच्च प्राथमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 12 ऑगस्ट रोजी होणार

बुलडाणा- परीक्षा परिषदेमार्फत इयत्ता 5 वी ची पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व इयत्ता 8 वीची पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा ही 9 ऑगस्ट रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार होती. मात्र राज्यात काही जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे उद्भवलेली पुर परिस्थिती व बहुतांश ठिकाणी भुस्खलन झाल्याने विद्यार्थ्यांना दळणवळणास येणाऱ्या अडचणींबाबत राज्यतील अनेक संघटनांकडून निवेदने प्राप्त झाली. या निवेदनांचा विचार करता सदर परीक्षा ही 9 ऑगस्ट ऐवजी आता 12 ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे. यापूर्वी निर्गमीत करण्यात आलेले प्रवेशपत्र 12 ऑगस्ट 2021 रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्याकडून कळविण्यात आले आहे.

घरातच रहाल आत… तर कोरोनाला देता येईल मात..

तुम्ही आत.. तर कोरोना बाहेर..

सोशल डिस्टसिंग पाळायचे आहे… कोरोनाला हरवायचे आहे.