नांद्रा येथे माजी सैनिक यांच्या हस्ते 75 वा स्वतंत्रता दिवस उत्साहात साजरा

0
241
  1. आरोग्यदुत न्युज
    किरण सोनार नांद्रा (प्रतिनिधी)
    दि,१५/८/२०२१
    नांद्रा येथे माजी सैनिक यांच्या हस्ते 75 वा स्वतंत्रता दिवस उत्साहात साजरा
    नांद्रा ता. पाचोरा येथील क्रिएटिव्ह स्कूलमध्ये 75 वा ध्वजारोहणाचा सन्मान जेष्ठ माजी सैनिक जगन्नाथ पाटील यांना देण्यात आला. त्यांच्या हास्ते स्कुलमध्ये ध्वजारोहन करण्यात आले. याबरोबरच ग्रामपंचायत नांद्रा येथील ध्वजारोहन सरपंच आशा तावडे यांच्या हस्ते, जि. प. प्राथमीक शाळा येथील ध्वजारोहन ग्रा. प. सदस्या कल्पना सुभाष तावडे, तलाठी कार्यालय याचे ध्वजारोहन हिरालाल सूर्यवंशी, प्राथमिक आरोग्य केंद्र येथील ध्वजारोहन जि. प. सदस्य पदमसिंग पाटील, माध्यमिक विद्यालय येथे डॉ. वाय. जी. पाटील पाटील यासर्व मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी क्रिएटिव्ह स्कूलला विद्यार्थ्यांना आपल्या स्तुप्त कलागुणांना वाव मिळावा म्हणून व त्यांच्यात देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता व देश प्रेम वाढीस लागून त्यांना अभिव्यक्त होता यावे म्हणून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे ऑनलाइन लाईव्ह सादरीकरण करण्यात आले. यामध्ये ४० विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला होता. यामध्ये वकृत्व स्पर्धा, देशभक्ती गायन, फॅन्सी ड्रेस, नृत्य अशा स्पर्धेचा समावेश करण्यात आला होता. विद्यार्थ्यांना या नाविन्यपूर्ण ऑनलाइन शिक्षणाबरोबरच ऑनलाइन सांस्कृतिक कार्यक्रमात आपल्या विविध गुण कौशल्य दाखवण्याचं व्यासपीठ मिळाल्यामुळे त्यांच्यात प्रचंड उत्साह निर्माण होऊन त्यांनी आनंद व्यक्त केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका अरुंधती राजेंद्र यांनी केले तर प्रास्ताविक संस्थाध्यक्ष प्रा. यशवंत पवार यांनी केले. याप्रसंगी शिक्षिका वृंद मनीषा बडगुजर उज्वला महाले, पूजा सोनजे, हिना पाटील, शिपाई सुभाष पिंपळे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी साठी परिश्रम घेतले. यावेळी प्रमुख उपस्थितांमध्ये ग्रामपंचायत कमिटीचे विनोद तावडे, उपसरपंच शिवाजी तावडे, ग्रामपंचायत सदस्य सुभाष तावडे, किशोर खैरनार, सखाराम तुकाराम पाटील, संजय पाटील, ओम पवार, संदीप सूर्यवंशी, हिरालाल सूर्यवंशी, शरद बोरसे, गजानन ठाकुर हे उपस्थित होते. उपस्थितांचे आभार नम्रता पवार यांनी मानले.
    सदरील कार्यक्रम कोरोना चा प्रादुर्भाव विचारात घेता सर्व प्रकारचे शासकीय नियम पाळून संपन्न करण्यात आला