बुलडाणा- गुरु रविदास स्मारक समीती स्थापन करण्याचा तिढा कायम ? सोमवारी पुन्हा बैठक : एकतर्फी यादी देणाऱ्यांवर समाज बांधवांकडून तिव्र नाराजी

0
166

आरोग्यदुत न्युज
चंद्रशेखर सातदिवे
बुलडाणा- जिल्हा (प्रतिनिधी)
दि,२०/८/२०२१

बुलडाणा शहरात आमदार संजयभाऊ गायकवाड यांच्या संकल्पनेतून विविध महापुरुषांचे पुतळे बसविण्यात येणार आहेत त्यानुसार बुलडाण्यातील मुख्य संगम चौकात गुरु रविदास महाराज यांचा पुतळा बसविण्यात येणार आहे.
मात्र हे सर्व समाज बांधवांकडून समाजातील सर्व स्तरातील लोकांकडून बैठक बोलावण्यात येऊन समीती स्थापन करण्यात यायला पाहिजे म्हणून आम्ही गेल्या सहा महिन्यांपासून लक्ष्मणराव घुमरे दादा,दादासाहेब काटकर यांना फोन करुन बैठक बोलावण्यात यावी आपन जेष्ठ आहात म्हणून आम्ही विषेश प्राधान्य देऊन सामाजिक योगदान म्हणून जेष्ठ मार्गदर्शक म्हणून अनेकदा विषय काढला मात्र या जेष्ठ मंडळींकडून नेहमी पुढे ढकलण्यात आले,एक नव्हे तीनवेळा मीटिंग जाणुन बुजून पुढे ढकलण्यात आली.
हे आम्हाला कळल्यावर आम्ही कोणतेही राजकारण न करता आज दिनांक 20 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी बैठक बोलावण्यात येऊन बुलडाण्यातील सर्व समाज बांधवांना सदर मीटिंगला बोलावण्यात आले सदर मीटिंग ही बुलडाण्यातील जेष्ठ प्रशासकीय अधिकारी इंजि डि.टी.शिपणे साहेब यांच्या नेतृत्वात व आमदार संजय गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली बोलावण्यात आली त्यानुसार बुलडाण्यातील अनेक समाज बांधव उपस्थित झाले,मात्र काल काही लोकांनी आमदार संजय गायकवाड व त्यांचे पिए श्रीकृष्ण शिंदे यांच्याकडे एक 126 लोकांची यादी समाज बांधवांना कुठेही विश्वासात न घेता दिली त्या यादीत फक्त एकाच व्यक्तीचे अनेक नातेवाईक सगे सोयरे व त्याच्याच संघटनेचे लोक जानुन बुजून घेण्यात आले.सदर प्रकरणामुळे समाज बांधवोठ्या प्रमाणात दुःखी आहे.हा विषय आमदार संजय गायकवाड यांना माहीती होताच त्यांनी दोन्ही पार्टीला बैठकीत बसुन मार्ग काढण्याचे सुचविले.त्या मुळे गुरु रविदास स्मारक समीतीची लवकरच बैठक बोलावण्यात येऊन समस्त चर्मकार समाज बांधवांकडून गुरु रविदास स्मारक समीती स्थापन करण्यात येत आहे.कृपया सहकार्य करावे ही नम्र विनंती