भडगांव नगरपरिषद अग्निशामक दल कर्मचारी बांधवांना राखी बांधून राष्ट्रवादी महिलांनी केला रक्षाबंधन सण साजरा

0
154

आरोग्यदुत न्युज
चिंतामन पाटील पाचोरा (प्रतिनिधी)
दि,२४/८/२०२१
भडगांव नगरपरिषद अग्निशामक दल कर्मचारी बांधवांना राखी बांधून राष्ट्रवादी महिलांनी केला रक्षाबंधन सण साजरा
भडगांव- अग्निशामक दलाचे कर्मचारी संकट समयी आपल्या जीवाची पर्वा न करता संपत्तीचे रक्षण करतात. अनेक प्राणीमात्र तसेच मानवजातीचे संरक्षण करून देशसेवा रुपी कार्य करून बंधू भाव जपत असतात. राष्ट्रवादी महिला जिल्हा उपाध्यक्षा नगरसेविका योजना पाटील सह सहकारी महिला पदाधिकारी यांनी रक्षाबंधन निमित्त भडगांव नगरपरिषद अग्निशामक दलाचे अधिकारी कर्मचारी अनुक्रमे राजेंद्र पवार, वाल्मिक पाटील, भगवान कंडारे, विजय बोरसे, भैय्या पवार, नितिन पवार, राजेश क्रिशन, सचिन शेळके आदि बांधवांना राखी बांधून आरोग्यदायी शुभेच्छया दिल्या. सदर कार्यक्रमास नगरपरिषद मुख्याधिकारी रविंद्र लांडे, महिला जिल्हाध्यक्षा वंदना चौधरी, तालुकाध्यक्षा रेखा पाटील, शहराध्यक्षा हर्षा पाटील सह अधिकारी कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले.