आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा बुलडाण्यात उभारणार .आमदार संजय गायकवाड

0
461

आरोग्यदुत न्युज
चंद्रशेखर सातदिवे

बुलडाणा : जिल्हा (प्रतिनिधी)

दि,२९/८/२०२१
आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा बुलडाण्यात उभारणार

   आमदार संजय गायकवाड

राष्ट्रीय क्रीडा दिन थाटात साजरा

ओपन जिमचे लोकार्पण, आंतरराष्ट्रीय –राष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार

बुलडाणा : जिल्हयात आर्चरी या खेळाची कुठलीही आंतरराष्ट्रीय दर्जाची सुविधा उपलब्ध नसताना बुलडाणा येथील धनुर्धर खेळाडून आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त केले. येत्या 2024 च्या ऑलपिंक स्पर्धेत आर्चरीसह अन्य खेळांमध्ये पदके प्राप्त करण्यासाठी बुलडाण्यात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा उभारण्यात येतील. त्यासाठी क्रीडा विभागास जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून दिल्या जाईल, असे प्रतीपादन आमदार संजय गायकवाड यांनी आज केले. हॉकीचे जादुगार स्व मेजर ध्यानचंद यांचे जयंतीनिमित्ताने राष्ट्रीय क्रीडा दिन कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल, क्रीडानगरी, बुलडाणा येथे आज करण्यात आले. त्यावेळी ते बालत होते.

    याप्रसंगी जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, तहसिलदार रूपेश खंडारे, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव आदी उपस्थित होते. बुलडाणा शहरात भविष्यात आंतरराष्ट्रीय आर्चरी रेंज, तालुका क्रीडा संकुलाची उभारणी, आंतरराष्ट्रीय जलतरण तलाव, कुस्ती हॉल, मॅट्स, कव्हर, मल्टीपर्पज हॉल, वातानुकूलीत हॉल, संकुलामध्ये येण्यासाठी चांगला रस्ता निर्माण करण्यात येईल, असेही यावेळी आमदार संजय गायकवाड यांनी सांगितले. जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यावेळी म्हणाले, कोणताही एक खेळ निश्चित करून त्या खेळासाठी तण, मन व धनाने खेळाडूंनी प्रयत्न करावे. निश्चित केलेल्या खेळामध्ये करीअर करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील रहावे. राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या अनुषंगाने यावेळी ओपन जिमचे पुजन व फित कापून मान्यवरांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले.
सर्वप्रथम स्व. मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. त्यानंतर दिपप्रज्वलन करण्यात आले.  तसेच यावेळी सन 2020- 21 या वर्षातील जिल्हा युवा पुरस्कारार्थी प्रतिक सुभाष जोहरी व संस्थेमध्से कृषीसमृद्धी मल्टीपर्पज फाऊंडेशन, बुलडाणा यांना प्रशस्तीपत्र, गौरवचिन्ह तथा बक्षीसाचा धनादेश देण्यात आला. नुकत्याच पोलंड येथे झालेल्या जागतिक कनिष्ठ युवा चॅम्पीयनशिपमध्ये सुवर्ण पदक प्राप्त खेळाडू मिहीर नितीन अपार व सहभागी खेळाडू प्रथमेश समाधान जवकार, मार्गदर्शक चंद्रकांत इलग यांचा सत्कार करण्यात आला. तसेच जिल्हयातील विविध क्रीडा स्पर्धा तथा एकविध क्रीडा संघटनेच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभाग तथा प्राविण्य प्राप्त केलल्या खेळाडूंना प्रशस्तीपत्र देवून सन्मानित करण्यात आलेृ त्यामध्ये पवन पातोडे, कु. साक्षी हिवाळे, वैष्णवी पवार, भुषण सिरसाट, सुहास राऊत, शिवम भोसले, वैभव सोनोने, पंकज शेळके, प्रसाद रनाळकर, प्रेम बावस्कर, चेतन गवळी, ऋषीकेश जांभळे, सागर उबाळे, गौरी राठोड आदींचा समावेश आहे. तसेच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण, मुंबई यांच्या नवमहाराष्ट्र अभियान अंतर्गत युवा सामाजिक पुरस्कार म्हणून जिल्हयातील एकमेव डॉ. गायत्री सावजी यांची निवड झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला.
संचलन राज्य क्रीडा मार्गदर्शक अनिल इंगळे यांनी तर आभार प्रदर्शन क्रीडा अधिकारी रविंद्र धारपवार यांनी केले. यावेळी नेहरू युवा केंद्राचे अजयसिंग राजपूत, डॉ मनोज व्यवहारे, प्रा. कैलास पवार, प्रा. बाबाराव सांगळे, धर्मवीर आखाडा अध्यक्ष कुणाल गायकवाड, रवि पाटील, ॲड साखरे, विजय वानखेडे, राजेश डिडोळकर, औषध निरीक्षक गजानन घिरके, संदीप पाटील, ॲड दळवी, समधान जवकार, भरत ओळेकर, अंकुश बोराडे, नितीन अपार, संतोष शिंदे, दगडू सरकटे, डिगांबर पाटील, विठ्ठल इंगळे, गणेश जाधव, प्रविण चिम, सागर उबाळे, मोहम्मद इद्रीस, समाधान टेकाळे, शारिरीक शिक्षण शिक्षक, एकविध क्रीडा संघटनेचे पदाधिकारी, प्रशिक्षणार्थी, प्रशिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्रीडा अधिकारी बी. आर जाधव, राज्य क्रीडा मार्गदर्शक महेश खर्डेकर, जिल्हा संघटक सौ. मनीषा ढोके, वरिष्ठ लिपीक विजय बोदडे, व्यवस्थापक सुरेशचंद्र मोरे, विनोद गायकवाड, कैलास डुडवा, भिमराव पवार, कृष्णा नरोटे, गणेश डोंगरदिवे, दिपक जाधव यांनी प्रयत्न केले