कुरंगी ग्रामपंचायतीचे ” आदर्श गाव कुरंगी ” बनवण्याच्या दिशेने यशस्वी वाटचाल सुरूगाव बचावं पॅनेल’चे प्रमुख योगेशभाऊ ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरपंच सौ.मनिषाताई गणेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपसरपंच शालीक पवार व ग्रामपंचायत सदस्य सह सचिव ग्रामसेवक अविनाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पहिली ग्रामसभा उत्साहपुर्ण वातावरणात झाली संपन्न !!

0
612

 

ग्रामसभेत विविधआरोग्यदुत न्युज
किरण सोनार नांद्रा (प्रतिनिधी)
दि,३१/८/२०२१

ठराव सर्वानुमते मंजुर तर तरूण वर्गाचा जोरदार प्रतिसाद व ग्रामस्थांनी लावली हजेरी

पाचोरा प्रतिनिधी : कुछ पाने के लिये कुछ खोना पडता है,अच्छे कामो के लिये बुरा होना पडता है ” या अनुषंगाने समाजात समाज हितासाठी व गावहितासाठी चांगले समाजसेवी कार्य करत असतांना, चांगले निर्णय घेतांना काही थोडेफार अडथळे येणारच आहेत पण तशा परीस्थित दोन-चार लोकांचा विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा अख्या गावाच्या सर्वांगीण विकासाचा ध्येय व उद्दिष्टे जर आपण डोळ्यासमोर ठेऊन संकल्प केला तर नक्कीच त्यानुसार कामकाज प्रत्यक्ष करून दाखवले तर त्या गावाची दिशा व वाटचाल आदर्शगावा’कडे जात असते.हिचं दिशा व हिचं वाटचाल आपल्या निर्णय,धोरणांतुन आणि गाव विकासाच्या विविध योजनांतुन विविध कामे करून कुरंगी हे गावं पुढील ४ वर्षात आदर्शगावा’कडे नेण्याचे संकल्प गाव बचाव पॅनले’चे पॅनेलप्रमुख योगेश भाऊ ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली व सरपंच सौ.मनिषाताई गणेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्याचे प्रथम ग्रामसभेत संकल्प करण्यात आले.

या ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले.

या ग्रामसभेची विशेषता म्हणजे सर्वसामान्य नागरीकांचे प्रश्न व अडी-अडचणी सोडवण्यात याव्यात यासाठी ग्रामसभा हि नेहमीप्रमाणे ग्रामपंचायती इमारतीत न घेता – सर्वांना या ग्रामसभेत आपला सहभाग नोंदवता यावा *यासाठी हि ग्रामसभा मोकळ्या पटांगणात मंडप टाकुनी घेण्यात आली आणि सर्व नागरीकांचे मतं ऐकुन घेतली गेलीत तर सर्व उपस्थित ग्रामस्थांसाठी कुरंगी ग्रामपंचायतीतर्फे चहा-पाणी व नाश्ता’ची सोय करण्यात आली होती.

वाळु चोरी ,मुरूम चोरींवर १००% निर्बंध घालण्यात आले तर अवैध दारू व अवैध धंदे पण गावात बंद व्हावे अशी मागणी काही तरूणांनी व महिलांनी केली.

शासनाचे विविध योजनांची माहिती,गावात करावयाची कामांचे तपशील,झालेले कामे -खर्च आणि होणारी कामे,झालेली कर वसुली आणि थकीत वसुली,गटारी, सार्वजनिक शौचालय,रस्ते, सार्वजनिक दिवाबत्ती,पिण्याचे पाणी,पाईपलाईन दुरूस्ती,तसेच गाव विकासासाठी विविध समित्यांची स्थापना,घरकुल योजना,रोजगार हमी योजना,जाॅब कार्ड,रेशन कार्ड, अंगणवाडी,शाळा,महसुल संदर्भात सर्व विषयांवर चर्चा करून मंजुरी देण्यात आली.

या ग्रामसभेला गाव बचाव पॅनेल’चे पॅनेलप्रमुख योगेश ठाकरे,सरपंच सौ.मनिषा गणेश पाटील,उपसरपंच शालीक पवार, सचिव ग्रामसेवक अविनाश पाटील, तलाठी दवंगे, अंगणवाडी सेविका,आशासेविका, आरोग्य सेवक,सह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ आणि तरूण वर्ग उपस्थित होते.