योजना पाटील आदर्श रणरागिणी पुरस्काराने सन्मानित

0
207

आरोग्यदुत न्युज
चिंतामन पाटील पाचोरा (प्रतिनिधी)
दि,२/९/२०२१

योजना पाटील आदर्श रणरागिणी पुरस्काराने सन्मानित
भडगांव मानव संरक्षण समिती नवी दिल्ली रजि.- भारत सरकार भडगांव तालुका महिला अध्यक्षा योजनाताई पाटील 25 वर्षांपासून समाजसेवेचे कार्य करीत आहेत. या प्रदीर्घ समाजसेवेच्या काळात ताईंनी अनेक पदे विभूषित केली आहेत. सामाजिक, राजकीय, धार्मिक, क्रीडा, अंधश्रद्धा निर्मुलन आणि जनजागृती इत्यादी क्षेत्रात तसेच कोरोना पार्श्वभूमीवर ताईंनी प्रशंसनीय कामगिरी केली आहे. यशस्विनी अभियान प्रमुख, पोलिस महिला दक्षता समिती अध्यक्षा तसेच नगरसेविका म्हणून त्या काम करत असताना शहराच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. शासनाच्या विविध योजना निराधार गरजूंना मिळवून देण्यासाठी ताई सतत प्रयत्नशील असतात. गरजू विद्यार्थ्यांना मदत करणे, कष्टकरी महिला किंवा अशा अनेक उपेक्षितांना वेगवेगळ्या प्रकारची मदत करणे ताईंचे अशा विविध प्रकारचे समाज सेवेचे कार्य अविरत सुरू असताना योजनाताईंना अनेक पुरस्कार मिळाले आहेत.नुकताच योजनाताईंना भारत सरकार संलग्न महाराष्ट्र शासन पुरस्कार सामाजिक सेवा संस्था कोल्हापूर मार्फत महाराष्ट्र राज्यस्तरीय आदर्श रणरागिणी या पुरस्काराने गौरविण्यात आले. त्याबद्दल ताईंचे हार्दिक हार्दिक मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील यशस्वी वाटचालीस लाख लाख शुभेच्छा…!!!