मौजे गऊळ- साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा सन्मानाने बसवा  अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करू (विष्णू भाऊ कसबे साहेब)

0
213

 आरोग्यदुत न्युज
चंद्रशेखर सातदिवे (प्रतिनिधी)
दि,५/९/२०२१

मौजे गऊळ- साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा सन्मानाने बसवा  अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करू (विष्णू भाऊ कसबे साहेब)
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळा सन्मानाने बसवा अन्यथा राज्यभर तीव्र प्रमाणात आंदोलन मा.-विष्णू भाऊ कसबे साहेब
मौजे गऊळ तालुका कंधार जिल्हा नांदेड येथे 2/9/2021 रोजी अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा पोलीस प्रशासनाकडून काढण्यात आला आणि मातंग समाजातील बंधू-भगिनींना अमानुषपणे मारहाण करण्यात आली याप्रसंगी समाजबांधवांची भेट घेण्यासाठी प्रचंड मोठा समाजाचा फौजफाटा घेऊन माननीय विष्णू भाऊ कसबे साहेब यांच्यासह विविध पदाधिकारी गऊळ ता.कंधार येथे दिनांक 5/9/2021 रोजी समाजाच्या वेदना जाणून घेण्यासाठी व प्रशासनाला जाब विचारण्यासाठी गऊळ येथे पोहोचले,गऊळ येथे माननीय जिल्हाधिकारी माननीय पोलीस अधीक्षक साहेब नांदेड यांच्या बैठकीमध्ये त्यांनी मत व्यक्त करताना सुद्धा त्यांच्याकडे समाजाच्या वेदना सांगितल्या आणि अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचा तोडगा काढल्या शिवाय आपण जाऊ नये अशा पद्धतीचे प्रशासनाला सुचित केल गेल, त्यानंतर गवळी येथील व पंचक्रोशीतून जमलेल्या सर्व समाज बांधवांना संबोधित करत असताना त्यांनी सांगितलं अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा त्या ठिकाणी बसला पाहिजे आणि ज्या समाजातील मुलांवर गुन्हे दाखल झाले आहेत ते गुन्हे प्रशासनाने पाठीमागे घेतले पाहिजे ज्या पद्धतीने लाठीचार्ज झाला तो अत्यंत गैर कायदेशीर आहे या प्रकरणाची रीतसर उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे, असे न झाल्यास आणि समाजाला न्याय न मिळाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन आम्ही करू अशा पद्धतीचे आव्हान समाजाला त्यांनी केले. याप्रसंगी लोकस्वराज्य आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष रामचंद्र भंराडे, सचिन भाऊ साठे मानवी लोकशाही पार्टी, मा. मारुती वाडेकर मा.माधव डोम्पले, सुरेंद्र घोडजकर,अण्णाभाऊ साठे क्रांती आंदोलनाचे सतिस कावडे,परमेश्वर बंडेवार लहुजी शक्ती सेना चे युवक प्रदेश अध्यक्ष सचिन भाऊ शिरसागर,लहुजी शक्ती सेना मराठवाडा अध्यक्ष दिलीप अर्जुनेसर, नागोराव आंबटकर,प्रीतम गवाले,प्रदीपभाऊ वाघमारे, संतोष भाऊ सूर्यवंशी,टि.के.दाढेल,मामा गायकवाड,मारुती वाघमारे हातणीकर,रामभाऊ साबळे बालाजी मेकाले,गजानन वाघमारे, अशोक उफाडे,टि.ल.कांबळे,व्यंकटी सोनटक्के,बाळु लोंढे, साईनाथ मळगे, महेंद्र कांबळे, नागोराव कुडके शिवराज दाढेल, यांच्यासमाजातील अनेक कार्यकर्ते अनेक बंधू-भगिनी व पंचक्रोशीतील सर्व समाज बांधव होता.