जिल्हास्तरिय अलिम्को शिबिराचा ३५६ दिव्यांव विद्यार्थ्यांनी घेतला लाभ

0
190

आरोग्यदुत न्युज
चंद्रशेखर सातदिवे
जळगाव जिल्हा (प्रतिनिधी)
दि८/९/२०२१
जिल्हास्तरिय अलिम्को शिबिराचा
३५६ दिव्यांव विद्यार्थ्यांनी घेतला लाभ
जळगाव- समग्र शिक्षा अभियानांतर्गत समावेशित शिक्षण उपक्रमातर्गंत जिल्ह्यातिल दिव्यांग विद्यार्थ्यांना सहाय्यभुत साधनांची उपलब्धता करून देण्यासाठी शहरातिल कांताई सभागृहात तिन दिवशिय अलिम्को शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या अलिम्को शिबिरात जिल्ह्यातिल २५१ विद्यार्थ्यांची तज्ञ डाॅक्टरांकडुन तपासणी करण्यात आली तर १०५ दिव्यांग विद्यार्थ्यांना कॅलिपर साहीत्य वितरित करण्यात आले.
शिक्षण विभागात दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी समग्र शिक्षा अभियानांतर्गत समावेशित शिक्षण कार्य सुरू असुन १ ली ते १२ वी पर्यंतच्या २१ प्रकारच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना सहाय्यभुस साधनांची उपलब्धता शासनामार्फत करण्यात येते.तज्ञ डाॅक्टरांच्या तपासनिनंतर गेल्या दोन वर्षांपासुन जागतिक महामारिच्या परिस्थितिमुळे जिल्हास्थरिय अलिम्को शिबिराचे आयोजनात अनेक अडचणी निर्माण होत होत्या.यावर्षी सर्व अडचणिंवर मात करत तिन दिवशिय जिल्हास्तरिय अलिम्को शिबिराचे आयोजन कांताई सभागृहात घेण्यात आले.या शिबिराचा शुभारंभ जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थाचे (डाएट) प्राचार्य डाॅ.अणिल झोपे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी डाएटचे जेष्ठ अधिव्याख्याता डाॅ.सी.डी.साळुंखे व जिल्हा सक्षमिकरण समन्वयक सुष्मा इंगळे यांची उपस्थीती होती.या तिन दिवसाच्या शिबिरात २५१ दिव्यांग विद्यार्थ्यांची तपासणी मुंबई येथिल तज्ञ डाॅक्टर तथा प्राॅस्पेस्टिक अॅण्ड आॅरथौस्टिक पप्र्रविकुमार,हेमंतकुमार,दिपककुमार गुप्ता,आॅडिओलाॅजिस्ट श्याम ललित व सुधिर कहर यांनी केली.या शिबिरास जिल्हा परिषद शिक्षण सभापती रविंद्र पाटिल यांनी भेट देउन दिव्यांग विद्यार्थी व पालकांशी समन्वय साधला. तिन दिवस ग्रामिण भागातुन येणार्‍या दिव्यांग विद्यार्थी व पालकांना भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन मल्टीपर्पज फाउंडेशन जळगाव यांच्यातर्फे जेवण व फळ देण्यात आले.
जिल्हास्तरिय अलिम्को शिबिरासाठी जिल्हा समन्वय दत्तुसिंग पाटिल यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले तर शिबिर यशस्वितेसाठी सक्षमिकरण जिल्हा समन्वयक सुष्मा इंगळे,विवेक मोरे यांच्या नेतृत्वाखाली मिलिंद पाटिल,सुरेश सोनवणे,गुरूदास शिंपी,भिमराव भालेराव,अतुल पाटिल,दत्ताञय पाटिल,चेतन निकम,राहुल चौधरी,किशोर पाटिल यांच्यासह जिल्ह्यातिल सर्व समावेशित शिक्षण तज्ञ व विशेष शिक्षक यांनी परिश्रम घेतले.