जळगाव- जिल्ह्यात 23 सप्टेंबरपर्यंत 37 (1) (3) कलम जारी

0
272

आरोग्यदुत न्युज
चंद्रशेखर सातदिवे
जळगाव जिल्हा (प्रतिनिधी)
दिनांक – 8 सप्टेंबर, 2021

जिल्ह्यात 23 सप्टेंबरपर्यंत 37 (1) (3) कलम जारी
जळगाव – जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्यात 23 सप्टेंबर, 2021 पर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 चे पोटकलम (1) व (3) जारी करण्यात आले असून तसे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी राहुल पाटील यांनी निर्गमित केले आहे.
या कालावधीत पाच किंवा पाचपेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास संबंधित स्थानिक पोलीस स्टेशन कार्यालयाची पूर्व परवानगीशिवाय सभा घेण्यास किंवा मिरवणुका काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश शासकीय कार्यक्रम, प्रेतयात्रा यांना लागू राहणार नाही. मात्र जिल्हादंडाधिकारी, जळगाव यांचेकडील दि. 13 ऑगस्ट, 2021 मधील अटी लागू राहतील, असे अपर जिल्हादंडाधिकारी राहुल पाटील यांनी आदेशात म्हटले आहे.