अर्हता प्राप्त डॉक्टरांकडून वैद्यकीय प्रमाणपत्र ऑनलाईन अपलोड करता येणार युजर आयडी मिळविण्यास इच्छुक डॉक्टरांनी कागदपत्रे तपासणीसाठी सादर करावी

0
133

आरोग्यदुत न्युज
चंद्रशेखर सातदिवे
जळगाव जिल्हा (प्रतिनिधी
दि. ८/९/२०२१
शिकाऊ अनुज्ञप्ती आधार क्रमांकाचा वापर
करून ऑनलाईन मिळणार

अर्हता प्राप्त डॉक्टरांकडून वैद्यकीय प्रमाणपत्र ऑनलाईन अपलोड करता येणार

युजर आयडी मिळविण्यास इच्छुक डॉक्टरांनी कागदपत्रे तपासणीसाठी सादर करावी

बुलडाणा, (जिमाका) दि. 7 : परिवहन विभागाचे नागरिाकंच्या सोयी सुविधांसाठी पेपरलेस कामावर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यानुसार विभागाच्या बऱ्याच सुविधा ऑनलाईन करण्यात आल्या आहेत. आता यामध्ये शिकाऊ अनुज्ञप्ती (लर्नींग लायसन्स) सुविधेची भर पडली आहे. आधार क्रमांकाचा वापर करून शिकाऊ अनुज्ञप्ती ऑनलाईन पद्धतीने मिळणार आहे.
या प्रक्रियेन्वये आधार क्रमांकातील नाव, पत्ता व फोटोग्राफ डेटाबेस मधून स्वयंचलीतरित्या घेण्यात येतो. मात्र नमुना 1 (अ) मधील वैद्यकीय प्रमाणपत्र नागरिकांना कार्यालयात प्रत्यक्ष सादर करावे लागत आहे. नागरिकांचे कार्य पेपरलेस होणेकरीता एनआयसीद्वारे नमुना क्रमांक 1 मधील वैद्यकीय प्रमाणपत्र अर्हता प्राप्त डॉक्टरांकडे ऑनलाईन पद्धतीने करून अपलोड करण्याची प्रक्रिया करण्यात आली आहे. मोटार वाहन कायदा कलम 8 अन्वये वैद्यकीय प्रमाणपत्र निर्गमीत करण्याबाबत व केंद्रीय मोटार वाहन नियम 5 मध्ये त्याची अनिवार्यता निश्चित केलेली आहे.
शासनाने 13 सप्टेंबर 2013 च्या आदेशान्वये नमुना क्रमांक 1 मधील वैद्यकीय प्रमाणपत्र केवळ एमबीबीएस पदवी धारण करणारे डॉक्टर्स देवू शकतील असे निर्देशित केले आहे. ऑनलाईन शिकाऊ अनुज्ञप्तीची प्रक्रिया पेपरलेस होण्याकरीता नमुना क्रमांक 1 मधील वैद्यकीय प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीने अपलोड होणे अनिवार्य आहे.  कार्यक्षेत्रातील एमबीबीएस पदवी धारण करणारे डॉक्टर्स यांची एमबीबीएस पदवी मेडीकल कॉन्सील ऑफ इंडियाचे प्रमाणपत्र, क्लिनीकचे किमान चार छायाचित्र, कुठलेही एक ओळखपत्र आदी कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहे. कार्यक्षेत्रातील कागदपत्रे आपलोड केलेल्या प्रत्येक एमबीबीएस डॉक्टरला स्वतंत्र युजर आयडी देण्यात येणार आहे. त्यानंतर संबंधित वैद्यकीय व्यावसायिकांनी लॉग ईन करून अर्जदारांची नियमाप्रमाणे आवश्यक शारिरीक तपासणी करून नमुना क्रमांक 1 (अ) त्यांच्या स्तरावरून प्रमाणित करून तो अपलोड करणे आवश्यक आहे. तरी युजर आयडी प्राप्त करण्यासाठी इच्छूक एमबीबीएस डॉक्टरांनी सर्व मूळ कागदपत्रे तपासणीकरीता कार्यालयात सादर करावीत, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गोपाल वरोकार यांनी केले आहे.