महसूल राज्य मंत्री अब्दुल सत्तार त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे

0
1016

आरोग्यदुत न्युज
चंद्रशेखर सातदिवे
बुलडाणा जिल्हा (प्रतिनिधी)
दि,१३/९/२०२१
महसूल राज्य मंत्री अब्दुल सत्तार त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे

बुलडाणा:- राज्याचे महसूल, ग्रामविकास, खार जमीन विकास विशेष सहाय्य व बंदरे राज्यमंत्री अब्दुल सत्तार दिनांक  १३ व १४ सप्टेंबर रोजी बुलडाणा जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे : दिनांक १३ सप्टेंबर रोजी सेनाभवन, सिल्लोड जि. औरंगाबाद येथून धाड ता. बुलडाणा कडे सायं ५ वाजता मोटारीने प्रयाण, सायं ६ वा. धाड येथे आगमन व हाजी हुसैन यांचे निवासस्थानी सदिच्छा भेट, सायं ६.२० वाजता  धाड येथून चिखली कडे प्रयाण, सायं ७.२०   वाजता शासकीय विश्राम गृह, चिखली  येथे आगमन, राखीव व मुक्काम करतील.
दिनांक १४ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता शासकीय विश्राम गृह चिखली येथून गांधी नगर चिखली कडे प्रयाण, सकाळी १०.१० वा अभिजित राजपूत  यांचे निवासस्थानी  भेट व राखीव,  सकाळी १०.२० वाजता चिखली बाजार समिती सभापती नंदकिशोर त्र्यंबक सवडतकर  यांच्या निवासस्थानी भेट, सकाळी १०.३० वाजता माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या निवासस्थानी भेट, सायं १०.४० वाजता सवणा ता. चिखली येथील चंदन शेष क्रीडा व व्यायाम मंडळ येथे वृक्षारोपण, ई पीक पाहणी, सकाळी ११.३० वाजता सागवण, कोलवड ता. बुलडाणा येथील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी, दु. १२.१० वाजता पाडळी ता. बुलडाणा येथील अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी, दु. १२.५० वाजता रोहिनखेड ता. मोताळा येथील अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी, दु. १.२० वा. वडगांव खंडोपंत ता. मोताळा येथील अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी, दु. १.५० वा. अंत्री, बोराखेडी ता. मोताळा येथील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी, दु. २.२० वाजता शिवशंकर नगर, बुलडाणा येथे विशेष कार्य अधिकारी सुनील शेळके यांच्या निवासस्थानी आगमन व राखीव, दुपारी २.४० वाजता महसूल व जिल्हा परिषद विभागांची जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित आढावा बैठकीस उपस्थिती, दु. ४ वाजता साई नगर बुलडाणा येथे स्विय सहायक विवेक मोगल यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट व राखीव, दुपा. ४.२० वाजता शिवशंकर नगर बुलडाणा येथे माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर  यांच्या निवासस्थानी भेट व राखीव, सोयीनुसार बुलडाणा येथून सिल्लोड कडे प्रयाण करतील.