राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.       

0
542

आरोग्यदुत न्युज
चंद्रशेखर सातदिवे
जळगाव जिल्हा (प्रतिनिधी)
दि,१६/९/२०२१
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा शुक्रवारचा जिल्हा दौरा
जळगाव, (जिमाका) दि. 16 – राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.

शुक्रवार, दि. 17 सप्टेंबर, 2021 रोजी सकाळी 9.00 वाजता पाळधी, ता. धरणगाव येथे अभ्यांगत व कार्यकर्त्यांच्या भेटी व चर्चा. सकाळी 10.30 वाजता पाळधी, ता. धरणगाव येथून पंचायत समिती कार्यालय,  धरणगावकडे प्रयाण. सकाळी 11.00 वाजता. पंचायत समिती, धरणगाव येथे आगमन व पंचायत समिती कार्यालय धरणगाव येथे शासकीय योजनांची आढावा बैठक. सोईनुसार पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव. दुपारी 3.45 वाजता पाळधी, ता. धरणगाव येथून अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगावकडे प्रयाण. दुपारी 4.00 वाजता अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे आगमन व जळगाव तालुक्यातील विविध विकास कामांबाबत मनपा, जळगाव, सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांच्या समवेत आढावा बैठक. सोईनुसार पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव.