महाप्रबंधक अनिलकुमारजी लाहोटी यांच्या दौऱ्या दरम्यान पाचोरा रेल्वे स्टेशनवर भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी प्रवाश्यांच्या समस्यांबाबत निवेदन दिले.

0
281

आरोग्यदुत न्युज
चिंतामण पाटील पाचोरा (प्रतिनिधी)
दि 23/९/२०२१

महाप्रबंधक अनिलकुमारजी लाहोटी यांच्या दौऱ्या दरम्यान पाचोरा रेल्वे स्टेशनवर भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी प्रवाश्यांच्या समस्यांबाबत निवेदन दिले.
काल दि.२२ सप्टेंबर रोजी सेंट्रल रेल्वे चे महाप्रबंधक अनिलकुमारजी लाहोटी यांच्या दौऱ्या दरम्यान पाचोरा रेल्वे स्टेशनवर भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी त्यांची भेट घेतली.याप्रसंगी मागील काळांत पाचोरा स्टेशनवर भारतीय जनता पार्टी ने केलेल्या रंगरंगोटी व सौंदर्यीकरणाचे त्यांनी कौतुक करत आभार देखील व्यक्त केले.यावेळी महाप्रबंधक मा.अनिलकुमारजी लाहोटी यांना खालील मागण्यांचे निवेदन दिले.
१) पाचोरा येथील नागरिक मोठया प्रमाणांत जळगाव,चाळीसगाव, नांदगाव,मनमाड येथे नोकरी व व्यवसाय निमित्त अप-डाऊन करत असुन पॅसेंजर गाडी बंद असल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.त्यासाठी लवकरात लवकर पेसेंजर/मेमु गाडी सुरू करून त्यांना मासिक पास मिळावा.
२) पाचोरा रेल्वे स्थानकावरून सायंकाळी ६.३० वा. नंतर नाशिक व मुंबई जाण्यासाठी कुठल्याही गाडीला थांबा नसल्याने गाडी नं.०२१०६
विदर्भ एक्सप्रेस व गाडी नं.०२८१० हावडा-मुंबई मेल ह्या गाड्यांना थांबा मिळावा.
३) तसेच पाचोरा येथून सुरत, बडोदा,अहमदाबाद येथे जाण्यासाठी एकही गाडीला थांबा नसल्याने गाडी नं. ०६५०१ अहमदाबाद-बेंगलोर (सोलापूर मार्गे) या गाडीला पाचोरा येथे थांबा मिळावा.अश्या मागणीचे निवेदन देण्यात आले.