एस टी बसमध्ये विनातिकिट प्रवास करू नये एस टी महामंडळाचे आवाहन

0
365

आरोग्यदुत न्युज
चंद्रशेखर सातदिवे

बुलडाणा-

 जिल्हा (प्रतिनिधी)
दि,२३/७/२०२१
एस टी बसमध्ये विनातिकिट प्रवास करू नये
एस टी महामंडळाचे आवाहन
बुलडाणा- राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी विना तिकिट प्रवास करून नये. आपली तिकिटे काळजी पुर्वक जपून ठेवावीत. मोटार वाहन कायदा 1988 नुसार विना तिकिट प्रवास करणाऱ्या व्यक्तीकडून त्याने चुकविलेल्या भाड्या व्यतिरिक्त प्रवास करणाऱ्या व्यक्ती कडुन त्याने चुकविलेल्या भाड्या व्यतिरिक्त प्रवास भाड्याच्या दुप्पट रक्कम किंवा 100 रूपये यापैकी जी रक्कम अधिक असेल ती दंड म्हणून वसुल करण्यात येईल. तपासणी अधिकारी यांनी बस तपासणीच्या प्रवाशांनी प्रवास केलेल्या मार्गाचे तिकिट दाखविणे आवश्यक राहणार आहे. तरी प्रवाशांनी प्रवासाचे तिकिट काढून राज्य परिवहन महामंडळास सहकार्य करावे, असे आवाहन विभाग नियंत्रक यांनी केले आहे.