भडगाव-कनाशी रस्त्यासाठी सव्वा तिन कोटी रूपये मंजुर आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते भुमिपुजन

0
234

आरोग्यदुत न्युज
चिंतामण पाटील पाचोरा (प्रतिनिधी)
दि,२४/९/२०२१
आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते भुमिपुजन, तीर्थक्षेत्र कनाशी जाणे होईल सोयीचे
भडगाव ता.24: राज्याच्या अंदाजपत्रक मधुन कजगाव ते कनाशी, भडगाव आमदडदे रस्ता, कजगाव ते कनाशी रस्ता कारपेट सिलकोट, कनाशी ते वडधे फाटा कारपेट सिलिकोट तर कोठली गावात काॅक्रीटीकरण कामाचे आज आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते भुमिपुजन करण्यात आले.
आमदार किशोर पाटील यांच्या प्रयत्नातुन कजगाव-वाडे गटातील विविध रस्त्यांना राज्याच्या अंदाजपत्रकातुन मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी सव्वा तिन कोटी रूपये मंजुरी करण्यात आले आहेत. भडगाव तालुक्यातील कनाशी तीर्थक्षेत्र म्हणून राज्यभरात लौकिक असून महाराष्ट्र भरातून या ठिकाणी भाविक मोठ्या भक्तीभावाने दर्शनाला येत असतात त्यामुळे भाविकांची व स्थानिक ग्रामस्थांची गौरसोय लक्षात घेता
आमदार किशोर पाटील यांनी दखल घेत या कामाच्या मंजूरीसाठी प्रयत्न केले होते.
आज सकाळी साडे दहा वाजता कोठली (ता.भडगाव) येथे कामाचे भुमिपुजन करण्यात आले. यावेळी
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे माजी जिल्हा परिषद सदस्य विकास पाटील, डॉ. विशाल पाटील, बाजार समितीचे माजी उपसभापती विश्वास पाटील, पंचायत समिती सदस्य रामकृष्ण पाटील, युवा नेते संजय पाटील, बाजार समितीचे प्रशासक युवराज पाटील, विजय पाटील, कोठलीचे सरपंच कांतीलाल पाटील, ग्रामपंचायत सदस्य विनोद पाटील, माजी तालुकाप्रमुख दीपक पाटील, गोंडगाव चे राहुल पाटील, बोदर्डे चे उपसरपंच बबलू पाटील, प्रकाश परदेशी, पप्पू पाटील, बांधकाम विभागाचे एस आर राऊत , भास्कर पाटील, भागवत पाटील, अनिल पाटील , प्रदीप पाटील आदि उपस्थित होते.