पाचोर तालुक्यातील लोहारा येथे भुरट्या चोरट्यानी मोबाईल दुकान फोडले

0
591

आरोग्यदुत न्युज
किरण सोनार नांद्रा (प्रतिनिधी)
दि,२७/९/२०२१
लोहारा येथे भुरट्या चोरट्यानी मोबाईल दुकान फोडले! मात्र डबल शटर असल्याने चोरीचा प्रयत्न फसला
पाचोर तालुक्यातील लोहारा येथे गेल्या काही दिवसांपासून भुरट्या चोरांनी डोके वर काढले आहे.
सविस्तर वृत्त असे की,येथील बसस्टँड परिसरात न्यू झेप इंडिया चे प्रतिनिधी अतुल माळी यांचे मोबाईल विक्री व दुरूस्तीचे दुकान आहे.आज दि.27 रोजी सकाळीच ते दुकानावर आले असता त्यांना दुकानाचे कुलूप तोडलेले आढळून आले.प्रथम क्षणी त्यांना धक्काच बसला होता.* मात्र दुकानाला डबल शटर असल्याने व डिजिटल कुलूप असल्याने या वेळी चोरांचा चोरीचा प्रयत्न फसला.
लोहारा येथे मोठी बाजारपेठ असून येथील बसस्थानक परिसरात अनेक लहान मोठे व्यवसाय करणारे व्यापारी आहेत, या भागात कित्येक वेळा अश्या चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे व्यापारी भयभीत झाले आहे.पोलीस प्रशासनाचा धाकच संपला का ? असे आता लोहारा ग्रामस्थांना वाटत आहे.
तरी पिंपळगाव(हरे ) येथे नुकतेच नियुक्त झालेले कर्तव्यदक्ष api श्री कृष्णा भोये यांनी लक्ष द्यावे, व भुरट्या चोरांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी व्यापारी बांधवांसह ग्रामस्थांची मागणी आहे.