रुग्णासाठी डॉक्टर आले देवासारखे धावून.सिद्धिविनायक मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल,पाचोरा

0
477

आरोग्यदुत न्युज
चिंतामण पाटील पाचोरा (प्रतिनिधी)
दि,२९/९/२०२१
रुग्णासाठी डॉक्टर आले देवासारखे धावून…
काल पासून पाचोरा-भडगाव परिसरात खूप जोरदार पाऊस पडत असून, नदी-नाले यांना खूप जास्त पाणी आल्यामुळे येण्याजाण्याचे रस्ते सुद्धा बंद झालेले आहेत…
त्यातच पाचोरा येथे एका महिलेला तातडीने रक्ताची आवश्यकता होती आणि वाहतूक ठप्प झाल्यामुळे कुठलाही रक्तदाता वेळेवर पोहचु शकत नव्हता.
डॉक्टरांना आपण नेहमीच देवाच्या रुपात बघतो योगायोगाने डॉ. स्वप्नील पाटील यांचा रक्तगट पेशन्टचा असल्याने स्वतः डॉ. स्वप्नील पाटील यांनी तात्काळ रक्तदान केले आणि त्या महीलेचा जीव वाचविण्यास यश मिळविले आणि आज त्याचा प्रत्यय सिद्धिविनायक मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल, पाचोरा चे डॉ. स्वप्नील प्रल्हादराव पाटील देवाच्या रुपात आले…
वेळीच रक्त देऊन त्या महिलेचे प्राण वाचवण्यास मदत केली.
दादासाहेब आपल्या या मानवीय मदती बद्दल मनापासून खुप सारे आभार…

योगायोगाने डॉ. स्वप्नील पाटील यांचा रक्तगट पेशन्टचा असल्याने स्वतः डॉ. स्वप्नील पाटील यांनी तात्काळ रक्तदान केले आणि त्या महीलेचा जीव वाचविण्यास यश मिळविले