जिल्हाधिकारी पोहचले थेट शेतकऱ्यांच्या बांधावर.

0
506

आरोग्यदुत न्युज
रवीशंकर पांडे वरखेडी (प्रतिनिधी)
दि,३०/९/२०२१
जिल्हाधिकारी पोहचले थेट शेतकऱ्यांच्या बांधावर.
कुऱ्हाड ता.पाचोरा – कुऱ्हाड खुर्द येथे दि.३० रोजी सकाळी अकरा वाजता जळगाव जिल्हाधिकारी श्री.अभिजित राऊत हे आपल्या ताफ्यासह लोहा रा रस्त्यावरील शेतकऱ्यांच्या शेतावरील बांधावर जाऊन पोहचले. दोन चार दिवसापूर्वी या परिसरात अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे अतोनात नुकसान झालेले होते. तसेच या परिसरात दोन दिवसाच्या पावसाने 214 मी मी पावसाची नोंद झालेली होती. यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील बाधित मालाची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी थेट शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन नुकसान झालेल्या मालाची शेतकऱ्यांसोबत पाहणी करून त्या संदर्भात चर्चा केली. यावेळी जील्हाधिकार्‍यांनी सर्व शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला .तसेच शेतक र्यानी सुद्धा या अधिकाऱ्यांसमोर नुकसानीचे पंचनामे न करता ओला दुष्काळ जाहीर करत सरसकट आर्थिक मदत मिळावी असे सांगितले. यावेळी अनेक शेतकऱ्यांनी नुकसान झालेल्या कपाशी पिकाच्या काळ्या पडलेल्या कैऱ्या व बोंडे जिल्हाधिकाऱ्यांना दाखविले.
या वेळी पाचोरा तहसीलदार कैलास चावडे, मंडळ अधिकारी संजय साळुंखे ,तलाठी बीएम परदेशी, तालुका कृषी अधिकारी श्री.जाधव,कृषी सहायक श्री.भोई,जिल्हा परिषद सदस्य दीपक राजपूत, शेतकरी सेनेचे जिल्हा प्रमुख अरुण पाटील,सरपंच कैलास भगत,सदस्य कौतिक पाटील व परिसरातील शेतकरी या वेळी उपस्थित होते.