आरोग्यदुत न्युज चिंतामण पाटील पाचोरा (प्रतिनिधी) दि,३/१०/२०२१
ब्रेकिंग न्यूज, पाचोरा. शिंदाड गावजवळ भीषण अपघात; लिंबाच्या झाडाला आदळून एक जन जागीच ठार.
आज संध्याकाळी सात वाजता दस्तगीर उर्फ काळू शरीफ तळवी वय ४० हे टूव्हीलर गाडीवरून वरखडी ते शिंदाड जात असताना शिंदाड गावापासून एक किलोमीटरच्या अंतरावर लिंबाच्या झाडाला आदळून जागीच ठार.
दस्तगीर उर्फ काळू शरीफ तळवी यांना आई, पत्नी, दोन मुली एक मुलगा,आहे.
अंबुलन्स चालक सागर भिकन पाटील यांनी तात्काळ दस्तगीर उर्फ काळू शरीफ तळवी यांना पाचोरा ग्रामीण रुग्णालयांमध्ये आणले.
डॉ आमित साळुंखे यांनी मयत घोषित केले.
पुढील तपास पाचोरा पोलीस करत आहे.