आरोग्यदुत न्युज
चंद्रशेखर सातदिवे
जळगाव जिल्हा (प्रतिनिधी)
दि,३/१०/२०२१
जळगावात दंगल, पोलिसांवर दगडफेक
दोन्ही गटांतील २९ जणांवर गुन्हा दाखल, ६ अटकेत.
जळगाव – जळगाव येथे खंडेरावनगरातील आझादनगर भोईवाडा परिसरात प्रेमीयुगूल फिरत असताना त्यातील तरुणीची छेड काढल्याच्या कारणावरून दोन गटात वाद झाला. तीन पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून त्यांच्यावर दगडफेक करत जखमी करण्यात आले. याचवेळी दोघा गटांनी एकमेकांवर दगडफेक केली. यात एक पोलीस कर्मचारी जखमी झाला. ही घटना शनिवारी रात्री साडेदहा वाजता घडली. रात्री उशिरा २९ जणांवर याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून त्यातील सहा जणांना अटक करण्यात आली आहे