आरोग्यदुत न्युज
चंद्रशेखर सातदिवे
जिल्हा (प्रतिनिधी)
दि,७/१०/२०२१
राज्यासाठी पुढचे ४ तास महत्त्वाचे,
हवामान खात्या कडून ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा
नागरिकांनी बाहेर जाताना खबरदारी घ्यावी
राज्यासाठी पुढचे ४ तास महत्त्वाचे, IMD कडून ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा
ज्यात पावसाने पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली आहे. कालही मुंबई शहरासह ठाणे आणि नवी मुंबईत जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे लोकल सेवेचाही काही काळासाठी खोळंबा झाला.
कालच्या या मुसळधार पावसानंतर आज पुन्हा एकदा अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, रत्नागिरी जिल्ह्यांत वेगळ्या ठिकाणी ३०-४० किमी/ताशी वेगाने वादळी वाऱ्यासह मध्यम ते तीव्र पाऊस पडेल. कोल्हापूर, पुणे, अहमदनगर, पालघरमध्ये पुढील ३-४ तासात पावसाची शक्यता असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहेत. त्यामुळे नागरिकांनी बाहेर जाताना खबरदारी घ्यावी अशी माहिती आयएमडी मुंबईकडून देण्यात आली आहे.
परतीच्या पावसाला सुरुवात
मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला आज ६ ऑक्टोबर पासून राजस्थान आणि गुजरातच्या काही भागातून सुरुवात झाली आहे. गुजरातच्या काही भागातून, पूर्ण राजस्थान, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेशचा